आषाढी वारी म्हटलं की, माऊली माऊली”, ”ज्ञानोबा माऊली तुकाराम”, ”विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल’ असा हरिनामाचा गजर करत, हातात टाळ घेऊन हरिनामाच्या जल्लोषात मग्न झालेले लाखो वारकरी डोळ्यासमोर येतात. दरवर्षी देहू येथून तुकोबांची आणि आळंदीहून ज्ञानोबांची पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीसाठी जाते त्याबरोबर लाखो वारकरी देखील पंढरपूरला पायी जातात. आषाढी वारी हा संपूर्ण महाराष्ट्राचा उत्सव असून या काळात सर्वत्र उत्साह आणि चैतन्याचे वातावरण असते. यंदाच्या आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर वारीतील अनेक व्हिडीओ पाहायला मिळत आहे. सध्या अशाच एका परदेशी महिलेचा वारीमधील व्हिडीओ चर्चेत आला आहे.
आषाढी वारीमध्ये कित्येक वारकरी वर्षांनुवर्ष वारी करतात. काही वृद्ध वारकरी देखील वारीमध्ये सहभागी होतात. आषाढी वारीचे आकर्षण परदेशी नागरिकांना देखील आहे. अनेक परदेशी नागरिक आषाढी वारीमध्ये दरवर्षी सहभागी घेतात आणि महाराष्ट्राच्या संस्कृती आणि वारकरी परंपरेचा अनुभव घेतात. सध्या अशा एका परदेशी महिलेचा व्हिडीओ चर्चेत येत आहे जी गेल्या दहा वर्षांपासून आषाढी वारी करत आहे. ही महिला जर्मनीमधून महाराष्ट्रात आषाढी वारी करण्यासाठी आली आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, जर्मन महिलेने महाराष्ट्रीय नऊवारी नेसलेली आहे. गळ्यात तुळशीच्या माशा घातल्या आहेत. कपाळावर टिकली आणि कुंकू लावले आहे. त्या महिलेला पाहताक्षणी असे वाटते की वारकरी महिलांपैकीच एक आहे . तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल महिला हिंदी भाषेत वारकऱ्यांशी संवाद साधत आहे. एका व्यक्ती महिलेला विचारतो, माऊली येथे येऊन चांगले वाटतेय का? त्यावर उत्तर देताना ती महिला म्हणते, मी गेल्या दहा वर्षांपासून येते, का नाही चांगले वाटणार? व्हायरल व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. अनेकांनी व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.
हेही वाचा – देसी हॅरी पॉटर! झाडू वापरून तरुणाने बनवली हटके बाईक, Video पाहून नेटकरी चक्रावले
विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, परदेशातील लोकांना वारीचे महत्त्व काय कळून आलंय पण आपल्या राज्यात अजूनही काही लोकांना वारी काय किंवा एवढ्या संख्येने लोक कशासाठी जातात हे समजलं नाहीये, रामकृष्ण हरी माऊली”
अनेकांनी “जरी हरी विठ्ठल”, “राम कृष्ण हरी” असा विठूनामाचा जयघोष करत आहे.