Viral video: एखाद्या वाहनचालकाकडून थोडासाही नियम चुकवला तरी वाहतूक पोलीस कायद्याचा बडगा उगारीत त्याच्यावर दंडात्मक कारवाई करतात. मुंबई पोलीस वारंवार नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन करीत असतात. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करीत वाहतुकीचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करीत असतात. नागरिकांकडून नेहमीच नियमांचं पालन केले जाण्याबाबत अपेक्षा केली जाते. मात्र, पोलीसच कायदा मोडत असतील, तर त्यांच्यावर कोण कारवाई करणार, हा खरा प्रश्न आहे. कारण- एका पोलिसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये पोलिसाने हेल्मेटही घातले नाही आणि वर तो अरेरावी करीत आहे. याचा संतापजनक व्हिडीओ व्हायरल होत असून, नेटकरीही यावर संतापले आहेत.

जेव्हा वाहतूक पोलिसच वाहतुकीचे नियम मोडतात

Police beaten in Nigdi Three arrested
पुणे : निगडीत पोलिसांना मारहाण; तिघे अटकेत
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Video : येरवड्यात दहशत माजविणारा गुंड प्रफुल्ल कसबेच्या साथीदारांची धिंड, पाेलिसांकडून भरचौकात साथीदारांना चोप
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘पुण्यात ७ दुकानं, १५ कोटींचा संपूर्ण मजला…’, आमदार सुरेश धसांचा ‘आका’कडील संपत्तीबाबत मोठा दावा
Police Commissioner issues stern warning to goons Pune news
पोलीस आयुक्तांकडून गुंडांना कडक इशारा; ‘कायदा पाळा, अन्यथा शहर सोडून जा’
Transgender actress Shubhi Sharma
तृतीयपंथी अभिनेत्रीचा झाला अपघात; दुचाकी चालकाने दिली धडक, पोलिसांनी केली मदत
Pune Rickshaw Driver's Frustration with Constant Honking Captured in Viral Puneri Pati Video
“हॉर्नचा वापर कमी करा, इथे कोणी….” सतत हॉर्न वाजवणाऱ्यांवर वैतागले रिक्षावाले काका! रिक्षामागे लावली पुणेरी पाटी, Video Viral
pune viral video man break all traffic rules
पुणे पोलीस आहात कुठे? भररस्त्यात जोडप्याने अक्षरश: मर्यादा ओलांडली? VIDEO पाहून संतापले लोक

वाहनचालकांना हेल्मेटच्या सक्तीला सामोरे जावे लागते. परंतु, शहरातून प्रवास करताना पोलिस हेल्मेट वापरत नाहीत, असे दिसते. मग हा नियम पोलिसांसाठी लागू नाही का, असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून विचारला जात आहे. विशेष म्हणजे या पोलिसानं हेल्मेट न घातलेल्या बाईकचालकाला दंड ठोठावला आणि मग स्वत: तो हेल्मेटशिवायच बाईक चालवू लागला. दरम्यान, ही घटना उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद या ठिकाणी घडली आहे.

लोक भडकले

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणानं बाईक चालवताना वाहतूक नियमाचं उल्लंघन केलं. त्याशिवाय त्यानं हेल्मेटदेखील घातलं नव्हतं म्हणून पोलिसानं त्याला दंड ठोठावला. पण, नंतर तोच पोलीस स्वत: हेल्मेट न घातला बाईक चालवू लागला. हे पाहिल्यानंतर ज्या लोकांना दंड ठोठावण्यात आला होता, ते लोक भडकले आणि पोलिसाला जाब विचारू लागले. पण यावेळी पोलिसानं प्रत्युत्तरादाखल उलट मोठ्या तोऱ्यात तो कुठल्या पोलीस ठाण्यामध्ये काम करतो ते सांगितलं. मग तेथे जमलेल्या लोकांनी या नियम तोडणाऱ्या पोलिसाचा व्हिडीओ शूट केले आणि सोशल मीडियावर शेअर केले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जिवंत साप पकडला, धुतला अन् खाल्ला; जेलमधून बाहेर येताच व्यक्तीचं विचित्र कृत्य; VIDEO पाहून थरकाप उडेल

पोलिसच जर वाहतुकीचे नियम पाळत नसतील तर?

खरं तर सगळे लोक वाहतुकीचे सर्व नियम पाळतात की नाही हे पाहण्यासाठी बऱ्याच ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदीदेखील केली जाते. त्यामध्ये हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे, ट्रिपलिंग राईड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय जर कोणताही वाहनचालक वाहतूक पोलिसांच्या हाती लागला, तर त्यांना चलान भरावं लागणार हे निश्चित. परंतु, पोलिसच जर वाहतुकीचे नियम पाळत नसतील तर?

या व्हिडीओवरती लोक भरभरून कमेंट्स करीत आहेत. तर असे अनेक लोक आहेत की, जे या व्हिडीओला शेअर आणि लाइक करीत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे.

Story img Loader