सोशल मीडियावर गाझियाबादचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका हिंदू संघटनेचे पदाधिकारी गाझियाबादमध्ये ट्रॅफिक पोलिसांसोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. हिंदू रक्षा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पिंकी चौधरी आणि गाझियाबाद ट्रॅफिक पोलीस यांच्यात झालेल्या बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र या वादाचं कारण एकून तुम्हीही अवाक् व्हाल.
हिंदू गटाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण
एका कारला वाहतूक पालिसांनी दंड ठोठावल्यानंतर हा वाद सुरु झाला. कारला दंड ठोठावला हे मूख्य कारण नसून ‘जय माता दी’ स्टिकर असलेल्या वाहनाला दंड का ठोठावला? असा सवाल करत हिंदू गटाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आली. सुरुवातीला हिंदू रक्षा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत त्यांचे काही अनुयायी त्याठिकाणी उपस्थित होते. यावेळी या सर्वांनी ट्रॅफिक पोलिसाला घेराव घातला आणि वाद घालायला सुरुवात केली. पोलिसांशी काही मिनिटांच्या वादानंतर पिंकी चौधरी यांनी पोलिसांवर ओरडायला सुरु केली. संबंधित वृत्त freepressjournal संकेतस्थळाने दिले आहे.
“हिंमत असेल तर ‘योगी’ला कॉल करा”
वाहतूक पोलिसांवर आरडाओरडा केल्यानंतर पिंकी चौधरीने त्यांचा मोबाईलही हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पिंकी चौधरीने ट्रॅफिक पोलिसांना त्यांच्या वरिष्ठांना फोन करण्यास सांगितले. तसेच “हिंमत असेल तर ‘योगींना’ कॉल करा” असेही सांगितले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलण्यास घाबरत नाही हे पोलिसांना दाखवण्याचा प्रयत्न ते करत होते. परंतु, वाहतूक पोलिसांनी हे सगळे संयमाने हाताळले असून त्यांना काहीही प्रत्युत्तर दिलं नाही. त्यांनी पिंकी चौधरी आणि त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांचे कृत्य आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केले.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “राजकारणात कधी पडू नकोस” पठ्ठ्यानं भविष्य सांगणाऱ्यालाच सांगितलं त्याचं भविष्य, VIDEO पाहून हसू आवरणार नाही…
पोलिसांनी दिलं कारवाईचं आश्वासन
हेही वाचा >> धक्कादायक! विद्यार्थिनीने डोक्यात फेकून मारली लोखंडी खुर्ची, शिक्षिका जागीच बेशुद्ध; घटनेचा Video Viral
दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी यावर योग्य ती कारवाई होईल असे आश्वासन दिले आहे. गाझियाबादच्या पोलीस अधिकाऱ्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत संबंधित घटनेची चौकशी सुरु असल्याची माहिती दिली आहे.