उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील पोलिसांनी एका कार मालकाचा २० हजारांचा दंड ठोठावला आहे. या कारचा एका व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या व्हिडीओमध्ये धावत्या गाडीवर दोघेजण दारुच्या नशेत नाचताना दिसत आहेत. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस खात्याला जाग आली असून त्यांनी ही कारवाई केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर गाझीयाबादमध्ये दारु प्यायलेल्या तरुणांचा एक गट त्यांच्या कारच्या टपावर नाचत आहे. लवकरच गाझीयाबाद पोलीस यांना त्यांच्या तालावर तुरुंगात नाचायला लावतील अशी अपेक्षा आहे,” अशा माहितीसहीत प्रशांत कुमार यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला होता. या ट्विटमध्ये गाझियाबाद पोलिसांचं ट्विटर हॅण्डल टॅग करण्यात आलेलं.

या व्हिडीओमध्ये ही गाडी बरीच वाहतूक असलेल्या रस्त्यावर धावताना दिसत आहे. या एर्टीगा कारच्या टपावर दोन व्यक्ती नाचताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे रस्त्यावर चालणाऱ्या या गाडीवर नाचणारे दोघेजण मद्यधुंद असतानाही नंतर गाडी चालवायला बसले. गाडी सरळ रस्त्याला लागल्यानंतर ते गाडीवर चढले आणि नाचले. त्यानंतर यापैकी एक जण गाडीचा चालक म्हणून गाडीत बसला तर दुसरा त्याच्या बाजूला बसला.

गाझियाबाद पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन माफी मागतानाचा त्यांचा व्हिडीओ पोस्ट केलाय. त्यांनी या दोघांना २० हजारांचा दंड ठोठावला आहे. पोलिसांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिलीय. १ एप्रिल रोजी हा सारा प्रकार घडल्याचं चलानमध्ये नमूद करण्यात आलंय. गाझियाबादमधील बुलंदशहर मार्गावरील सेक्टर १३ मध्ये रात्री आठ वाजता हा प्रकार घडल्याचं नमूद करण्यात आलंय.

पोलिसांनी तातडीने कारवाई केल्याबद्दल काहींनी समाधान व्यक्त केल्याचं या ट्विटखालील कमेंट्सवरुन दिसत आहे.