उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून एका माजी सैनिकाने कचरा गोळा करणाऱ्या गाडीवर वाजवले जाणाऱ्या गाण्याचा त्रास झाला म्हणून सफाई कर्मचाऱ्यांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले असून घटनेनंतर सफाई कामगारांनी एकजूट दाखवत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी सैनिकाने केला गोळीबार –

मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण गाझियाबादच्या लोणी येथील आहे, मुस्तफाबाद कॉलनीत कचरा गोळा करणारी गाडी आली होती. या कचरा गाडीवर “गाड़ी वाला आया जरा कचरा निकाल और स्वच्छ भारत” अशी गाणी वाजवली जात होती. यावेळी माजी सैनिकाने सफाई कर्मचाऱ्यांना गाणे बंद करायला सांगितले होते. यावरून सफाई कामगार आणि माजी सैनिकामध्ये वाद झाला.

हेही पाहा- चेन्नई जिंकताच चाहता झाला आऊट ऑफ कंट्रोल; हॉस्टेलमधील खिडकीत चढला अन्…, व्हायरल Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

कचरा गाडीमध्ये लावलेले गाणे ऐकताच संतापला माजी सैनिक –

सफाई कामगार आणि माजी सैनिकामधील वाद काही वेळाने टोकाला जाताच. रागवलेला माजी सैनिकाने घरातील परवाना असलेली बंदूक आणली आणि तीन वेळा गोळीबार केल्याचं सांगितले जात आहे. सुदैवाने या घटनेत सफाई कर्मचारी थोडक्यात बचावले. दरम्यान, आजूबाजूच्या लोकांनी आरोपी सैनिकाला पकडून बेदम मारहाण केल्याची माहिती देखील समोर येत आहे. या घटनेनंतर सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवत लोणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी सैनिकाला ताब्यात घेतले आहे.

हेही पाहा – …अन् अश्रू अनावर झालेल्या ‘त्या’ मुलीला जडेजाने न्याय मिळवून दिला; CSK चाहत्याचा भावूक करणारा ‘तो’ Video व्हायरल

सफाई कामगाराने सांगितले की, आरोपी माजी सैनिकाने कचरा गाडीवर वाजवल्या जाणाऱ्या भोंग्याचा आवाज ऐकून शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि नंतर गोळीबार केला. याआधीही दोनवेळा त्याच्याशी वाद झाल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. ही घटना २८ मे रोजी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी घडली, ज्यावेळी कचरा गाडी घेऊन आलेले दोन कामगार साफसफाईसाठी लोणी परिसरात गेले होते. गोळीबार करणाऱ्या आरोपी माजी सैनिकाचे नाव तौहीद असल्याचे सांगण्यात येत आहे. तर स्वच्छता अभियानाची गाणी घराजवळ वाजवू नये असं त्या सैनिकाचे म्हणने होते.