Ghibli Trend Video: सध्या इंटरनेटवर घिबली आर्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय. सगळ्यांनाच या कार्टूनिश आर्टचं वेड लागलं असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या ट्रेंडच्या मागे लागले आहेत.

अनेक युजर्स त्यांचे घिबली-स्टाईल फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत आणि या क्रिएटिव्हिटीवर आनंद व्यक्त करत आहे, तर काही लोकांनी हा ट्रेंड फॉलो करताना कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (AI) केलेल्या मजेदार चुका शेअर केल्या आहेत. सध्या अशीच एक चूक एका सोशल मीडिया इन्फ्लूएंसरच्या घिबली आर्टमध्ये झालीय जी तिने शेअर करत मजेशीर कॅप्शन दिलं आहे.

घिबली ट्रेंडने काय केलं पाहा… (Ghibli Trend Gone Wrong)

इंस्टाग्रामवर७०,००० हून अधिक फॉलोअर्स असलेल्या गायिका धनश्री पाटील अलीकडेच व्हायरल होणाऱ्या घिबली ट्रेंड ट्राय केला – परंतु या ट्रेंडचा विचित्र निकाल पाहून तिला धक्काच बसला.

धनश्री पाटीलच्या घिबली फोटोमध्ये नेमकी काय चूक झाली? तर तिने तिचा मूळ फोटो अपलोड केला होता, ज्यामध्ये ती एका पायऱ्यांवर आरामात बसलेली दिसत होती, तिने एक सुंदर हिरवा गाऊन आणि एक पांढरा जॅकेट परिधान केला होता. तिला स्वतःला स्टुडिओ घिबली स्टाईलमध्ये ती कशी दिसेल हे पहायचे होते, परंतु एआयने तर कमालच केली. तिचा फोटो आर्टिफिशीयल करून सुंदर करण्याऐवजी टूलने तिला एक अतिरिक्त पाय देण्याचा निर्णय घेतला!

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @musical_dhanno_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला “तीन पैर कहासे आए (तीन पाय कुठून आले?)” अशी कॅप्शन दिली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ११.५ मिलियन व्ह्युज आले आहेत.

या अनपेक्षित पण मजेदार चुकीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले, ज्यांना त्यांचे हसू आवरता आले नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर कमेंट्स केल्या आहे. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “एआय बीइंग एआय”, तर दुसऱ्याने, “तीन पायांची मुलगी”. अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “पण हा तिसरा पाय आला तरी कुठून” तर एकाने “Ghibli ट्रेंडने तर वाटच लावली”

दरम्यान, याआधीही घिबली स्टाईल फोटो करताना अनेकांच्या फोटोंमध्ये चुका आढळल्या आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी याचे फोटो शेअर करत घिबली स्टाईलची खिल्ली उडवली आहे. सध्या या गायिकेचा घिबली स्टाईल फोटो चांगलाच चर्चेत आहे.