Elephant Attack Viral Video : घनदाट जंगलात फिरत असताना अनेकदा पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वाघ, सिंह, बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्यांनी माणसांची शिकार केल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. जंगल सफारी करताना पर्यटकांनी योग्य ती खबरदारी घेऊन प्राण्यांच्या हल्ल्यापासून स्वत:चं संरक्षण करावं, अशा सूचनाही वन विभागाकडून दिल्या जातात. पण काही पर्यटक जंगलात फिरताना नियमांचं उल्लंघन करतात आणि आपला जीव धोक्यात टाकतात. असाच काहीसा धक्कादायक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक पिसाळलेला हत्ती पर्यटकांवर हल्ला करण्यासाठी जीपचा पाठलाग करतो. हत्ती पाहून सर्व पर्यटकांची दमछाक होते आणि वाहनचालक कशाप्रकारे धाडस करतो, हे व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहिल्यानंतर तुम्हालाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.
हत्तीचा हा थरारक व्हिडीओ travelzomin नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. जंगल सफारीसाठी गेलेले पर्यटक जीपमध्ये बसलेले असतानाच अचानक एक भलामोठा हत्ती त्यांच्या पाठलाग करतो. हत्ती इतका पिसाळलेला असतो की, जीपच्या वेगाप्रमाणेच तो पर्यटकांवर हल्ला करण्यासाठी धावत जातो. हत्ती हाकेच्या अंतरावर असतानाच वाहनचालक जीप मागच्या दिशेनं पळवतो. पण हत्तीही सुसाट धावून पर्यटकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हत्ती जीपच्या अगदी जवळ आल्यावर वाहनचालक धाडस दाखवून जीपचा वेग वाढवतो. त्यामुळे हत्तीच्या हल्ल्यापासून पर्यटकांची सुखरूप सुटका होते.
इथे पाहा व्हिडीओ
जंगलात फिरताना वन्य प्राणी कोणत्या क्षणी हल्ला करतील, याचा अंदाज लावता येणार नाही. कारण शिकारीसाठी मुक्तसंचार करणारे हिंस्र प्राणी समोर एखादा माणूस दिसला की, हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. वाघ, सिंब, बिबट्याच्या हल्ल्यात माणसांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तरीही काही माणंस जंगलात फिरताना नियमांचं पालन करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. वन विभागाचे अधिकारी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी अनेकदा आवाहन करत असतात. पण काही लोक जंगलातही नको ते धाडस दाखवयला जातात आणि स्वत:ची फजिती करून घेतात.