Giant Python Shocking Video : सोशल मीडियावर साप, अजगराचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असे व्हिडीओ पाहून एकतर आपण आश्चर्यचकित होतो किंवा पाहून प्रचंड भीती वाटते. कारण हे प्राणी असतातच इतके विषारी आणि महाकाय की पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. विषारी सापाच्या एका दंशाने माणसाचा क्षणात मृत्यू होऊ शकतो, तर अजगर आपल्या विळख्यात अडकवून माणसाचा क्षणात जीव घेतो. त्यामुळे फक्त माणूसच नाही तर प्राणीदेखील अजगरापासून अंतर राखून राहतात. सध्या अजगराचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात शिकार करताना महाकाय अजगराबरोबर अशी काही भयानक घटना घडते की, ज्यात त्याचा मृत्यू होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजगर त्याच्या ताकदीसाठी ओळखला जातो. एखादा शिकारी त्याच्या तावडीत सापडला तर त्याला जीव वाचवणे जवळपास अशक्य असते. या व्हिडीओतही एक महाकाय अजगर शिकाऱ्याला गिळण्याचा प्रयत्न करताना स्पष्ट दिसतोय. मात्र, कालव्यातील पाण्याच्या जोरदार प्रवाहात त्याला स्वत:चा तोल सांभाळता आला नाही, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनी जेव्हा कालव्यात पाहिले तेव्हा त्यांनाही धक्का बसला. यावेळी अनेकांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली. पण, यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अजगराने मरेपर्यंत आपली शिकार सोडली नाही.

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एका कालव्यात महाकाय अजगर प्राण्याची शिकार करताना दिसतोय. हा प्राणी गाय आहे असे दिसतेय. पण, कालव्यात पाण्याचा प्रवाह इतका जास्त आहे की, अधिक वजनामुळे अजगर बुडू लागतो, यावेळी तो पाण्यातून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करतो, पण त्याला ते शक्य होत नाही. यात शिकारीला जबड्यात पकडून पोहणं त्याला अशक्य होतं, अशाने कालव्यातच अडकून अजगराचा मृत्यू होतो.

स्थानिकांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली, त्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीचा आढावा घेतला. नंतर अजगराला कालव्यातून बाहेर काढले. तथापि, बचाव केल्यानंतर काही वेळातच अजगराचा मृत्यू झाला.

अजगराचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, हे दृश्य पाहण्यासाठी कालव्यावरील पुलावर स्थानिक लोकांची गर्दी जमली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी यला नैसर्गिक संतुलनाचा भाग असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी ही घटना भयंकर आणि धक्कादायक म्हटली आहे.