आपल्या पृथ्वीवर अनेक महाकाय प्राणी आहेत ज्यांना पाहून अनेकांचा थरकाप उडतो. अशा प्राण्यांच्या समोर जाण्याचीही कोणी हिंमत करत नाहीत. त्यापैकी एक म्हणजे अजगर. आपण अनेकदा अजगराने माणसांनाही गिळून टाकल्याचे व्हिडीओ पाहिले आहेत. वजनाने आणि लांबीने मोठ्या असलेल्या या अजगराला पकडण्याची हिंमत कुणीही करत नाही. मात्र, जर एखाद्याने युक्तीने त्याला पकडायचं ठरवलं तर त्याला हे जमू शकतं का? सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात भलमोठ्या अजगराला पकडण्यासाठी अशाप्रकारे सापळा रचला आहे की अजगरही त्यात सहज फसलाय. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दलदल असलेल्या भागात एका शिकारीने अजगराची शिकार करण्यासाठी पाईपच्या पुढे एक कोंबडी ठेवली आहे. अशा स्थितीत जेव्हा महाकाय अजगर पाण्यातून येतो आणि कोंबडीला गिळण्यासाठी पाईपमध्ये घुसतो तेव्हा तो तिथेच अडकतो. अजगर कोंबडीला पकडण्याचा किंवा पाईपच्या आतून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु तसे होत नाही. कोंबडीच्या अमिषापोटी अजगर शिकारीच्या जाळ्यात अडकतो.

( हे ही वाचा: Viral Video: लग्नमंडपात नवऱ्याची नजर चुकवत प्रियकराने नवरीच्या भांगात भरला ५ वेळा सिंदूर; त्यानंतर तिला ओढून…)

महाकाय अजगर कसा अडकला जाळ्यात ते एकदा पाहाच

( हे ही वाचा: हत्तीला मारण्यासाठी वाघ धावला अन्… गजराजने अवघ्या ३० सेकंदात डावच पालटला; पाहा Viral Video)

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @processvideoz नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. अवघ्या १५ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत २.९ दशलक्ष म्हणजेच २९ लाख वेळा पाहिला गेला आहे, तर १९ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Story img Loader