गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर अमेरिकेतील एका अम्यूजमेंट पार्कमध्ये सर्वात मोठी स्लाइड उघडणार असल्याची चर्चा होती. पण, आता ही स्लाइड उघडल्यानंतर केवळ चार तास बंद करण्यात आल्याचे वृत्त आहे. कारण त्यावरून घसरत खाली येत असताना मुलं हवेत दूरवर फेकले जात होते. यानंतर ते खूप वेगाने खाली आदळत होते. मुलांना दुखापत होण्याचा धोका पाहून काही वेळातच ही स्लाईड बंद करण्यात आली. मिशिगनच्या बेले आइल पार्कमधील विशाल स्लाइड शुक्रवारी उघडली आणि नंतर काही तासांनंतर बंद सुद्धा झाली कारण पालकांनी मुलांना दुखापत होण्याचा धोका असल्याबाबत चेतावणी दिली.

या ऐतिहासिक राइडमुळे झालेल्या गोंधळाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की स्लाइडवर अनेक लोक आहेत, जे त्यांना हवेत फेकले जात आहेत. हे अत्यंत धोकादायक ठरू शकतं. स्लाइडवरून येत असताना एक दोन नव्हे तर पाच ते सहा वेळी हवेत फेकले जाऊन पुन्हा खाली स्लाईडवर जोरात आदळले गेले. त्यामुळे यात चुकून डोक्याला सुद्धा दुखापत होण्याची शक्यता होती. हे लक्षात घेऊन अमेरिकेतील ही सर्वात मोठी स्लाइड सुरू झाल्यानंतर लगेचच चार तासात बंद करण्यात आली. या स्लाइडची डिझाईन योग्य पद्धतीने केली नसल्याने हे घडलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

आणखी वाचा : दुधाने मुलीचे पाय धुतले आणि तेच दुध प्यायले, बाप-लेकीच्या नात्याचा हा गोंडस VIRAL VIDEO पाहाच

हा व्हिडीओ artcombatpod नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर हा व्हिडीओ बघता बघता व्हायरल देखील झाला. या व्हिडीओला आतापर्यंत ११ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर काही नेटकरी हा व्हिडीओ पाहून हैराण होत इतक्या मोठ्या स्लाइडला सुरू करण्यापूर्वी सुरक्षेबाबत कोणतीही खात्री कशी काय करून घेतली नाही, असा सवाल उपस्थित करत आहेत. तसंच काय बिघाड झाला हे समजून घेण्यसाठी चार तास लागले याबाबत आश्चर्य व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा : मेट्रोत चिमुकलीचा GOMI-GOMI गाण्यावर जबरदस्त डान्स, VIRAL VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘मागे वळून तर पाहा’

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : मेंढ्यांसारखे ‘बा-बा’ करणाऱ्या माणसांचा VIDEO VIRAL:, हावभाव पाहून पोट धरून हसाल!

एका यूजरने लिहिले की, “यावर मला मोठ्याने हसू आले! माफ करा, पण ४ तास समस्या समजून घेणे ठीक नव्हते? OMG,” दुसर्‍या यूजरने लिहिले की, “हे गणित आणि अभियांत्रिकीचे मी पाहिलेल्या सर्वोत्तम उदाहरणांपैकी एक आहे. ते खूप महत्वाचे आहे.”
दरम्यान, ABC13 शी बोलताना पार्कला भेट देणारी केन्याटा मॅकडॅनी म्हणाली की वेग ही समस्या बनल्यामुळे तिच्या मुलांसाठी मजा भीतीमध्ये बदलली. “मी जे पाहिले ते असे की ते उंचावरून खाली येत असताना ते स्लाइडवर आदळत होते. तर मॅकडनीचा मुलगा केमार म्हणाला की, मी कल्पनेपेक्षा वेगाने खाली जात होतो. त्यामुळे दुखापत झाली,”

स्लाईड बंद करण्यासाठी ऑपरेटरला ४ तास लागले असे आउटलेटने कळवले. ही राइड शनिवारी संध्याकाळी पुन्हा उघडण्यात आली आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Story img Loader