बर्फवृष्टी होणे किंवा गारपीट होणे यासारख्या गोष्टी हिवाळ्यात अनेक देशांत होतात. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. पण नुकत्याच सैबेरियात पडलेल्या गारांनी सगळ्यांना आश्चर्यात टाकले. सैबेरियाच्या १८ किलोमीटर लांब किनारपट्टीवर जवळपास फुटबॉलच्या आकाराएवढ्या गारा आढळल्या. आतापर्यंत कुठेच इतक्या मोठ्या आकाराच्या गारा सापडल्या नसल्याने सगळेच हैराण झाले आहेत. याचे काही फोटोही सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहेत. हे गोळे तयार कसे झाले याबाबत काही प्रश्न अनुत्तरित आहेत. पण बर्फांचे छोटे गोळे वा-यासोबत वाहून एकत्र आल्याने एवढ्या मोठ्या आकाराचे गोळे तयार झाल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. दरम्यान किना-यावर पसरलेल्या या मोठ्या बर्फाच्या गोळ्याची बातमी सोशल मीडियावर पसरताच अनेकांनी बघण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी केली आहे. अशा प्रकारे मोठ्या आकाराचे बर्फाचे गोळे तयार होण्याची घटना दुर्मिळ आहे.