Shocking video: सर्वत्र नवरात्रीचं मंगलमय वातावरण आहे, नवरात्री निमित्त ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन होत आहे. दरम्यान काही लोकांना रिस्क घ्यायला, अॅडवेंचर गेम्स खेळायला खूप आवडतात. हे गेम्स असे असतात की पाहून सर्वसामान्यांना चक्कर येईल. जगात अनेक साहसी लोक असतात. ज्यांना हटके आणि धाडसी गोष्टी करायला आवडतात. असं म्हणतात की अशा खेळांमुळे एक प्रकारची किक मिळते, अंगात एक वेगळीच उंर्जा संचारते. तो एक प्रकारचा अविस्मरणीय अनुभव असतो असं म्हणा ना, मात्र हा अनुभव काही वेळेस जिवावर देखील बेततो. आशाच एका नवरात्री दरम्यानच्या धक्कादायक प्रकरणाचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

५० जण पाळण्यात उलटे अडकले

नवरात्री निमित्त आकाश पाळण्यात बसलेल्या लोकांना उत्साह चांगलाच नडला आहे, दिल्लीतील नरेला येथे एका नवरात्रीच्या जत्रेदरम्यान आकाशपाळणा हवेतच थांबला होता. या सगळ्या प्रकारामुळे पाळण्यात बसलेल्या लोकांचा जीव मात्र टांगणीला लागला. यामध्ये तब्बल ५० जण बसले होते. सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झाली नाही मात्र हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आकाश पाळण्यात बसण्याआधी आता शंभर वेळा विचार कराल. या व्हिडीओही जोरदार व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, उंच आकाश पाळणा दिसत आहे. त्यात मोठ्या लोकांपासून लहान मुलांपर्यंत जवळ जवळ ५० जण अडकले आहेत, किंचाळत आहेत. ज्यामध्ये फिरत असताना अचानक पाळणा कसा बंद झाला हे दिसत आहे. जीव मुठीत घेऊन लोक बसलेले दिसत आहेत. यानंतर अडकलेले लोक बाहेर येताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> शेवटी लेक महत्त्वाची; सासरच्या जाचाला कंटाळलेल्या लेकीला बापाने वाजत गाजत घरी आणलं, VIDEO पाहून कराल कौतुक

यानंतर अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावण्यात आलं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. या पाळण्यात लहान मुलंही मोठ्या प्रमाणावर बसतात, त्यामुळे पाळण्यांच्या सुरक्षांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Giant wheel stopped in navratri delhi fair 50 people were riding on it shocking video viral srk