Gudi Padwa 2022 : गेल्या दोन वर्षांपासून करोनाची साथ आणि त्याअनुषंगाने आलेल्या निर्बंधांमुळे सर्वच सणांवर निर्बंध टाकण्यात आले होते. त्यामध्येच गुढी पाडव्याचा देखील समावेश होता. मात्र, यंदा गुढी पाडव्यापासूनच म्हणजेच आजपासूनच राज्यातील करोनासंदर्भातले सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. शिवाय, मास्कची सक्ती देखील हटवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच मुंबई, ठाणे, दादर, गिरगाव, डोंबिवली या भागात गुढी पाडव्याच्या शोभायात्रांचा उत्साह दिसून येत आहे.
यंदा गिरगावात शिवसेनेतर्फे आरोग्यगुढी उभारण्यात आली आहे. सकाळी सर्वप्रथम गुढीचं पारंपारिक पूजन करण्यात आलं. त्यानंतर भव्य शोभायात्रा सुरु झाली. ट्रेडीशनल कपडे घालून नटून सजून तरुणाई या शोभायात्रेत सहभागी होताना दिसत आहे.
(हे ही वाचा: Gudi Padwa 2022 : प्रियजनांना पाठवण्यासाठी खास मराठी शुभेच्छा मेसेज!)
शोभायात्रेत भव्य चित्ररथ दाखवण्यात आलेत. यंदा महाराष्ट्राचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारे असे एकूण १५ चित्ररथ गिरगावच्या शोभा यात्रेचं प्रमुख आकर्षण आहेत.