Viral Video: भाऊ आणि बहीण यांच्यातील नाते टॉम आणि जेरी कार्टूनसारखे असते. एकमेकांशी भांडतात, एकमेकांवर रागावतात; पण दुसऱ्या क्षणाला कठीण प्रसंगात एकमेकांना तितकीच साथ देतात त्यामुळे कालांतरानं त्यांच्यातील नातं अधिक मजबूत होतं. आज सोशल मीडियावर या नात्याचं एक उत्तम उदाहरण पाहायला मिळालं आहे. कर्करोगाशी झुंज देणाऱ्या चिमुकलीला दोन आठवड्यांनी भेटताच भाऊ-बहिणीचे अश्रू अनावर झाल्याचं दिसतं.

कॅन्सर किंवा कर्करोग हा शब्द जरी ऐकला तरीही छातीत धडधडून येतं. कर्करोगग्रस्त व्यक्तीस वा तिच्या कुटुंबातील सदस्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. पण, इथे तर एका चिमुकलीला कर्करोग झालेला आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेली ही चिमुकली दोन आठवड्यांनंतर जेव्हा तिच्या मोठ्या बहीण आणि भावाला भेटते तेव्हा तिघांनाही अश्रू अनावर होतात. एकदा पाहाच भावंडांचे हे प्रेम.

Two hundred patients of hair loss problem ICMR team in Shegaon
केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
mother emotional video sad stories of elderly mother
“माझं कोणी नाही रडायला….” वृद्ध आईचे ते शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी; काळजाला भिडणारा VIDEO तुम्हाला काय वाटत?
Brother uses Polaroid camera for sisters photoshoot
मी तुझे फोटो काढू का?’ भावाने लाडक्या बहिणीचे केले फोटोशूट; प्रेमळ VIDEO पाहून म्हणाल, ‘भाऊ असावा तर असा!’
mother shouts at the Pet Dog
आई अशीच ओरडते ना? घरभर केस पडलेले पाहून श्वानाला ओरडली अन्… ; VIDEO पाहून येईल हसू
Delhi CM Atishi
Video : बिधुरींच्या आक्षेपार्ह विधानानंतर वडिलांबद्दल बोलताना दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अश्रू अनावर; म्हणाल्या, “ते इतके आजारी असतात की…”
Bride grand Welcome To The Chawla with Band
‘हा आनंद केवळ चाळीतच…’ नव्या सुनेचं असं स्वागत कधी पाहिलं नसेल; Viral Video पाहून आठवतील जुने दिवस
Daughter Made Shirt For Dad
‘फक्त लाडक्या बाबांसाठी…’ लेकीने शिवला खास शर्ट; ‘तो ‘खास मेसेज पाहून भारावून जाईल मन; पाहा रिक्षाचालकाचा Viral Video

हेही वाचा…श्वानाची मदत करण्यासाठी तारेवरची कसरत; व्यक्ती लाकडी फळीवर चढली अन्… पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, कर्करोगाशी लढा देणारी चिमुकली दोन आठवड्यांनंतर तिच्या भावंडांना भेटते. आपल्या चिमुकल्या बहिणीला पाहून मोठा भाऊ गुडघ्यावर बसतो आणि तिला अलगद मिठी मारतो. चिमुकल्या बहिणीवर उपचार सुरू असताना या दोन्ही मोठ्या भावंडांना तिला बघता आलं नाही, तिच्याबरोबर खेळता आलं नाही. त्यामुळे तिला पाहता क्षणी त्यांना अश्रू अनावर झाले आणि ते एकमेकांना मिठी मारताना दिसले.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @goodnews_movement’s या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. भावंडांचं हे प्रेम पाहून नेटकरीही भावूक होत आहेत आणि विविध शब्दांत या व्हिडीओतील व्यक्तींचं कौतुक करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहे. तसेच काही जण त्यांच्या भावंडांबरोबरच्या आठवणीसुद्धा कमेंट्समध्ये सांगताना दिसून आले आहेत.

Story img Loader