आता एमपीएससी किंवा यूपीएससीसाठी तयारी करायची म्हटलं तर विशेषतः मुलीच्या बाबतीत प्रश्न उभा राहतो वाढत्या वयाचा आणि लग्नाचा. साधारण एक-दोन वर्षांनंतर अपेक्षित यश मिळत नसेल तर दुसऱ्या क्षेत्रात नोकरी किंवा लग्न झाल्यावर मग अभ्यास कर या विचारांकडे पालकांचा कल असतो. पण तुमचा निर्णय पक्का असेल आणि अभ्यासाची तयारी असेल तर मात्र कसल्याही परिस्थितीत अभ्यास करून यशस्वी होता येत हे,PSI पूजा कदम या तरुणीने करुन दाखवलं आहे. या तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधली पूजा कदम ही गुजरातमध्ये राहून झाली महाराष्ट्राची फौजदार झाली आहे. तिच्या या यशाचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पूजा स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलींना मार्गदर्शन करत आहे. अभ्यास करताना लोक काय बोलतात याकडे लक्ष देऊ नका तर आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रीत करा. आपल्या यशाने लोकांची तोंडं बंद करा असा सल्ला पूजानं दिलाय. पुढे ती सांगते, गुजरातमध्ये स्थायीक असून तिने महाराष्ट्रात येऊन अभ्यास करत पीएसआय झाली.
पाहा व्हिडीओ
परिस्थिती कशीही असो पण ती बदलण्याची ईच्छा प्रबळ असेलना तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. आणि हेच दाखवून दिलं PSI पूजा कदम या तरुणीनं. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात वर्दी मिळवली. आई-वडिलांनी दिवस-रात्र केलेल्या कष्टांवर प्रियांकानं मिळालेल्या वर्दीनं आणि मेहनतीनं सुखाची फुंकर घातली.