Viral Video: असं म्हणतात की, तरुणपणीचं आंधळं प्रेम हे जगावेगळं असतं. अनेकदा तरुण मुलं-मुली जेव्हा पहिल्यांदा प्रेमात पडतात, तेव्हा त्या प्रेमात एकमेकांकडून त्यांना कोणतीही अपेक्षा नसली तरी जिद्द असते आणि ती कित्येकदा चुकीचीही असते. अनेकदा अशा प्रेमात पडलेल्या या तरुणांना आपण नेमकं काय करतोय, याची तितकी समजही नसते. सोशल मीडियावर पहिल्या प्रेमाबाबत तुम्ही अनेकदा वाचलं असेल किंवा ऐकलं असेल. कधी प्रेमामुळे आई-वडिलांकडून मार, तर कधी आईवडिलांपासून लपविलेलं प्रेम, असे प्रेमाचे अनेक भन्नाट किस्से तुम्ही ऐकले किंवा वाचले असतीलच. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणीला तिचे वडील बॉयफ्रेंडबरोबर असताना रंगेहाथ पकडतात. दरम्यान, त्यानंतर नेमकं काय घडलं ते पाहाच.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणी शहरातील बसस्थानकावर बसलेली आहे. यावेळी बसस्थानकावर बसून तरुणी प्रियकरासोबत रोमान्स करताना दिसत आहे. मुलगी तिच्या प्रियकराच्या मांडीवर बसून त्याला मिठी मारत आहे. त्या मुलीला आपल्याला कोणी पाहील की नाही किंवा तिच्या कृतीवर कोणी आक्षेप घेईल की नाही याची अजिबात पर्वा नाही. व्हिडीओ पाहून सुरुवातीला तुम्हाला कळणार नाही, नेमकं काय घडतंय. मात्र, ज्यावेळी त्या ठिकाणी तरुणीचे वडील येतात तेव्हा मात्र तरुणी आणि तिचा बॉयफ्रेंड अशा दोघांनाही घाम फुटतो.
या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वडील तो बॉयफ्रेंड आणि त्यांची मुलगी जिथे बसलेले असतात तिथे येतात. आपल्या मुलीला ते कारमध्ये नेऊन बसवतात. तिच्या प्रियकराला ते दमदाटी करताना दिसत आहेत. दरम्यान, त्यांचा राग अनावर होतो आणि ते त्याला मारायला सुरुवात करतात. हे पाहून ती तरुणी गाडीतून बाहेर येते. मात्र, वडील पुन्हा तिला गाडीमध्ये बसण्यास सांगतात. पुढे ते त्या तरुणाला समज देऊन, ते मुलीला घेऊन तिथून निघून जातात. ही संपूर्ण घटना बसस्थानकाजवळील एका इमारतीतून रेकॉर्ड करण्यात आली असून, ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Nagpur Car Video: सीए तरुण अन् इंजिनिअर गर्लफ्रेंडचे धावत्या कारमध्ये अश्लील चाळे; नागपुरातला धक्कादायक प्रकार
@Deadlykalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत ४५ हजारांहून अधिक वेळा तो पाहिला गेला आहे आणि अनेकांनी त्या व्हिडीओला लाइकही केले आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया युजर्स व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स करीत आहेत. एका युजरनं लिहिलं, “यामध्ये मुलीचीही चूक आहे. तिच्याही कानाखाली मारा.” आणखी एका युजरनं लिहिलं की, दीदींचं प्रेमाचं भूत पूर्णपणे नाहीसं झालं आहे. दुसऱ्या युजरनं लिहिलं की, तुमच्या मुलीची काळजी घ्या. ती कुठे जात आहे आणि कुठे येत आहे. पालकदेखील समान भागीदार आहेत.