Mumbai Metro Train Accident Video: सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईच्या मेट्रो वन ट्रेनचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मेट्रो ट्रेनमध्ये चढताना एका तरुणीचा ट्रेनच्या दरवाज्यात ड्रेस अडकला. त्यानंतर मेट्रो ट्रेन सुरु झाल्यावर तरुणी प्लॅटफॉर्मवर फरफटत गेली. ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. २१ ऑक्टोबरला ही घटना घडली असून याचा व्हिडीओ वेगानं इंटरनेटवर व्हायरल होताना दिसत आहे.

तरुणीचा दरवाज्यात ड्रेस अडकला अन् मेट्रो ट्रेन सुरु झाली

मुंबईच्या चकाला स्टेशनवर सायंकाळी सव्वाचार वाजताच्या सुमारास एक तरुणी ट्रेन अपघातातून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. या तरुणीचा ड्रेस मेट्रो ट्रेनच्या दरवाज्यात अडकला होता. त्यानंतर ट्रेन सुरु झाल्यावर ती तरुणी प्लॅटफॉर्मवरूनच फरफटत जात होती. त्याचदरम्यान एका प्रवाशानं तिला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. परंतु, ट्रेन वेगानं जात असल्यानं तरुणी प्लॅटफॉर्मच्या रेलिंगच्या टोकापर्यंत फरफटत गेल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा अपघात झाल्यानंतर तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

Mahakumbh Mela Video Viral Women Fight While Traveling To Prayagraj By Train shocking video goes viral
“अरे पाप धुवायला जाताय की करायला?” कुंभमेळ्याला जाताना महिलांनी ट्रेनमध्ये अक्षरश: हद्दच पार केली; VIDEO पाहून बसेल धक्का
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mumbai Chembur Metro accident
मुंबई : चेंबूरमध्ये मेट्रोचं अर्थवट बांधकाम रहिवासी सोसायटीच्या आवारात कोसळलं
Passenger's leg gets stuck in the door driver did not stop the bus
“माणूसकी मेली!”, दरवाज्यात अडकला प्रवाशाचा पाय, चालकाने थांबवली नाही बस, धक्कादायक घटनेचा Video Viral
Shocking video two man fight in running local dore in Virar local video viral on social media
VIDEO: “एक चूक अन् खेळ खल्लास” विरार लोकलच्या दरवाजात दोन पुरुषांमध्ये भयंकर हाणामारी; मान धरली अन् थेट…
Shocking video Mumbai Local Women Fought With Each Other At Dombivli Railway Station
“महिलांना आता पुरूषांची नाही महिलांचीच भिती” डोंबिवली रेल्वे स्टेशनवरील खतरनाक VIDEO होतोय व्हायरल
Thief calmly hangs from window of moving train in dangerous stunt
‘एक चूक अन् खेळ खल्लास!’ सुसाट वेगाने धावणाऱ्या रेल्वेच्या खिडकीत निवांतपणे लटकतोय हा चोरटा; जीवघेण्या स्टंटबाजीचा Video Viral
Jalgaon train accident marathi news
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे दुर्घटनेच्या चौकशीसाठी वरिष्ठांचे पथक

नक्की वाचा – स्कुटीवर खतरनाक स्टंटबाजी करून हिरोगीरी करणाऱ्या तरुणाला चांगलीच अद्दल घडली, पाहा भन्नाट व्हिडीओ.

इथे पाहा व्हिडीओ

मुंबईची लोकल ट्रेन किंवा मेट्रो ट्रेन प्रवाशांसाठी लाइफलाइनच आहे. पण या लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या ट्रेनमध्ये डब्यात चढण्याची घाई काही प्रवासी करतात. पण अती घाई संकटात नेई, या सूचनेचं पालन न केलेल्या प्रवाशांचा ट्रेन अपघात झाल्याच्या अनेक घटनासमोर आल्या आहेत. अशीच घटना चकाला स्थानकावर घडली होती. डब्यात चढताना तरुणीचा ड्रेस दरवाज्याला अडकल्याने तिचा मोठा अपघात झाल्याचा व्हिडीओ समोर आला. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ ट्रेनचे नियम मोडल्यावर काय परिणाम होतात, याचाच दाखला एकप्रकारे देताना दिसत आहे.

Story img Loader