प्रत्येक व्यक्तीच्या काही खास आवडी निवडी असतात. या आवडी निवडीच्या सर्व गोष्टी करण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. घोड्यावर बसून छान ऐटीत बसून स्वारी करण्याची अनेकांची इच्छा असतेच. ही संधी मिळाली की प्रत्येक व्यक्ती आपली ही हौस पूर्ण करून घेतो. पण घोडेस्वारी करणं म्हणजे काही खायचं काम नाही…असं अनेकदा तुम्ही ऐकलं असेल. या वाक्याला खरं ठरवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील घोडेस्वारी करण्यापूर्वी एकदा तरी विचार कराल.


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी घोड्यावर ऐटीत बसून घोडेस्वारीचा आनंद घेतेय. घोड्यावर बसल्यानंतर आपोआपच स्वतःमध्ये एक रूबाब झळकताना दिसतो. पण कधी कधी घोड्यावर बसल्यानंतर काही जणांना लाजिरवाण्या प्रसंगांना देखील समोरे जावे लागते. असाच काहीसा प्रकार या तरूणीसोबत घडलाय.

या व्हिडीओमध्ये दिसून येतंय की, घोड्यावर बसलेली ही तरूणी घोडेस्वारीमध्ये छान रमलेली आहे. पण अचानक हा घोडा जोरजोराने उड्या मारायला सुरूवात करतो. अचानक या घोड्याला नक्की काय झालं? हे काही कळण्याआधीच घोडा आणखी खवळतो. अशा परिस्थितीत घोड्यावर बसलेली तरूणी स्वतःला कशीबशी सावरताना दिसून येतेय. पण खाली पडण्याच्या विचाराने ती घाबरून जाते. अशात घोड्याने उडी मारल्यानंतर ती थेट बाजूला असलेल्या लोखंडी जाळ्यावर जाऊन पडते.

या घटनेचं पुढचं फुटेज समोर न आल्यानं तरूणीला दुखापत झाली का, याबाबतची माहिती मिळालेली नाही. यात मुलगी सुद्धा त्या लोखंडी जाळीला घट्ट पकडून खाली पडण्यापासून स्वतःला वाचवताना दिसून येतेय. ही संपूर्ण घटना जवळच उभा असलेल्या एका व्यक्तीनं कॅमेऱ्यात कैद केली. आता सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

तर, काहींनी कमेंट करत या मुलीबाबत चिंता व्यक्त केली आहे. जोशमध्ये केलेल्या घोडेस्वारीमुळे या तरुणीसोबत जे झालं ते पाहून कोणीही न शिकता किंवा काळजी न घेता घोडेस्वारी करणारच नाही. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सने हसू देखील आवरता येत नाही. या व्हिडीओला आतापर्यंत तीन लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १५ हजार पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.

Story img Loader