२०२४ वर्ष सुरू झाले आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला लोक जोरदार पार्ट्या करताना दिसले. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. दरम्यान, एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी दारू पिऊन गोंधळ घालताना दिसत आहे. तरुणीचे हे विचित्र वागणे पाहून हॉटेल कर्मचाऱ्यांनी तिला बाहेरचा रस्ता दाखवला मात्र तरीही तरुणी ऐकत नव्हती. हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतरही ती आरडाओरडा करत होती. यानंतर मात्र हॉटेल कर्मचाऱ्यांनी तरुणीला चांगलीच अद्दल घडवली. या घटनेचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर वेगाने शेअर होत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी मद्यधुंद अवस्थेत असून तिच्या आजूबाजूला लोक उपस्थित असल्याचे दिसत आहे. ती जमिनीवर बसून ओरडत आहे. लोक तिला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत पण ती कुणाचंच ऐकायला तयार नाहीये. तेथे उपस्थित हॉटेल कर्मचारी आणि इतर काही महिलांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता, महिलेने जमिनीवर लोळत पुन्हा ओरडायला सुरुवात केली. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी मुलीचा व्हिडिओ बनवला.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हा व्हिडिओ X वर @gharkekalesh नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: “भावा बुलेट आहे ती…” कार चालकानं बुलेटला मारली धडक; पुढे जे झालं ते पाहून व्हाल अवाक्
व्हायरल व्हिडिओवर लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले – हे दरवर्षी होते. आणखी एका युजरने लिहिले – कोणी महिलेसमोर बोलू शकते का? त्याच वेळी, एका यूजरने लिहिले – ती एक महिला आहे, ती काहीही करू शकते.