तरुणांना आपली कला आणि क्षमता दाखवण्यासाठी सोशल मीडियासारखं व्यासपीठ मिळालंय. या व्यासपीठामुळे अनेक जण रातोरात प्रसिद्धीच्या झोतातही आलेत. सोशल मीडियाचा आवाका खूप मोठा आहे. त्यामुळं एखाद्या व्यक्तीचं टॅलेंट मर्यादित न राहता ते जगाच्या कानाकोपऱ्यात अगदी कमी वेळात पोहोचतं. सध्या ‘कनिष्क टॅलेंट हब’ या युट्यूब चॅनेलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘जुडवा २’ या चित्रपटातल्या ‘ऊंची है बिल्डिंग’ या गाण्यावर एका तरूणीने डान्स केला आहे. तो सध्या सोशल मीडियावर तुफान गाजतोय.

वाचा : ‘ऊंची है बिल्डिंग’ गाण्यातल्या ‘सागरवाले राजा’ने सगळ्यांना गोंधळात टाकले

ही तरुणी कोण आहे हे समजू शकलं नाही. पण, तिचा डान्स लोकांना एवढा आवडला आहे की इंटरनेटवर अपलोड केल्यानंतर खूप कमी वेळात तो जबरदस्त हिट झाला आहे. फक्त सहा दिवसांत तो जवळपास साडेतेरा लाख लोकांनी पाहिला आहे. तेव्हा युट्यूबच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये ‘जुडवा २’ मधल्या ‘ऊंची है बिल्डिंग’ या मूळ गाण्याबरोबर तिच्याही व्हिडिओनं स्थान मिळवलंय. कोणताही सेट किंवा बडेजाव न करता बिल्डिंगच्या गच्चीवर चित्रित करण्यात आलेला हा व्हिडिओ मूळ गाण्याला तितकीच जोरदार टक्कर देताना दिसत आहे.

Story img Loader