Viral dance video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या या व्हिडीओंमध्ये आपला व्हिडीओही असावा यासाठी अनकेजण प्रयत्न करत असतात. यामुळेच मग ट्रेंड होणाऱ्या म्युझिकवर आपले डान्स करताना किंवा इतर व्हिडीओ शेअर केले जातात. कधी ट्रेनमध्ये तर कधी रस्त्यावर उभे राहून तरुणाई डान्स करत असलेले असंख्य व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अनेकदा हे डान्स इतके सुंदर असतात की, पाहणाऱ्याचंही अंग आपोआप हलायला लागतं. सध्या अशाच एका तरुणीचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामधील तिच्या अदा आणि डान्स स्टेप्सची सर्वांनाच भुरळ पडली आहे. हा डान्स बघून तुम्ही गौतमीलाही विसराल..

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुणीनं लाल रंगाची साडी नेसली आहे, यामध्ये ती अधिकच उठून दिसत आहे. मात्र यानंतर तिने असा जबरदस्त डान्स केला आहे की पाहून तुम्हीही म्हणाल वाहह. ती साडीतही अवघड अशा एकापेक्षा एक भारी स्टेप्स मारत आहे. ती एक उत्कृष्ट डान्सर असल्याचं तिच्या भन्नाट डान्सवरुन वाटत आहे. डान्स व्हिडिओ पाहून तुमचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत.

balya dance traditional folk dance from kokan
Video : कोकणकरांच्या जिव्हाळ्याचा विषय… बाल्या डान्स एकदा पाहाच, Video होतोय व्हायरल
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
ganeshotsav 2024 |Bappas welcome ceremony in the farmers bullock cart
Video : शेतकऱ्याच्या बैलगाडीतून बाप्पाचे आगमन; नेटकरी म्हणाले, “हीच आपली संस्कृती आहे..” मुंबईचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Janhvi Kapoor rumoured boyfriend shikhar pahariya reaction on devara daavudi song
“अप्सरा हो…”, ज्युनियर एनटीआरबरोबर जान्हवी कपूरचा जबरदस्त डान्स पाहून बॉयफ्रेंडची प्रतिक्रिया, म्हणाला…
Bigg boss marathi season 5 contestant Guligat Suraj Chavan's Dance
‘गुलिगत, एका बुक्कीत…’ सूरज चव्हाणचा ट्रेंडिंग गाण्यावरील डान्स तुफान व्हायरल; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “भावा, बिग बॉसमध्ये तुला फुल…”
natasa stankovic hardik pandya
Natasa Stankovic Insta Post: ‘प्रेम म्हणजे…’, हार्दिकशी घटस्फोटानंतर नताशाची सूचक पोस्ट व्हायरल; प्रेम आणि नात्याबद्दलचा उल्लेख!
a Muslim couple child became Shree Krishna at Janmashtami
मुस्लीम जोडप्याचा चिमुकला कान्हा! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “हाच आपला भारत…”
Aishwarya Narkar Dance With Amruta Raorane On aamir khan and Karisma Kapoor song
Video: “पूछो जरा पूछो…”, आमिर खान-करिश्मा कपूरच्या लोकप्रिय गाण्यावर ऐश्वर्या नारकर व अमृता रावराणेचा डान्स, एक्स्प्रेशनने वेधलं लक्ष

तिचा डान्स आणि एकेक अदा इतक्या सुंदर आहेत की पाहणाऱ्याला आपोआप भुरळ पडते. तिच्या या अदांवर नेटकऱ्यांनीही चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. तरुणीच्या डान्स प्रमाणेच तिच्या लूकनेही पाहणाऱ्यांना चांगलेच वेड लावले आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> आयुष्यापेक्षा नोकरी महत्वाची? मुंबई लोकलच्या महिला डब्यातून जीवघेणा प्रवास, वास्तव दाखवणारा VIDEO व्हायरल

muskan_kalra01 या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि प्रतिक्रिया येत आहेत. “हिच्यासमोर गौतमीही फिकी”, “वाहह काय स्टेप्स” अशाप्रकारच्या अनेक भन्नाट प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. डान्स हा प्रत्येकाचा आवडीचा विषय असतो. आपल्या आवडीचं गाण लागलं की आपल्याला राहावत नाही. मग ते कोणताही वेळ असला तरी. असाच हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.