सोशल मीडियावर डान्सचे वेगवेगळे व्हिडीओ पाहण्याला नेटिझन्स मोठ्या प्रमाणात पसंती देत असतात. अनेक डान्सचे व्हिडीओ हे विनोदी असतात. हे व्हायरल व्हिडीओ हास्यकल्लोळ उडवत असतात. तर काही व्हिडीओंनी संतापाचा पारा चढतो. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचं हसून हसून पोट दुखू लागेल. हा व्हिडीओ एका मुलीच्या डान्सचा आहे. एटीएममधून कॅश आल्यानंतर तिने हा डान्स केलाय. या मुलीचा डान्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून जवळपास १२ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय.
जवळपास २० सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक मुलगी एटीएममधून कॅश काढण्यासाठी आत प्रवेश करते. त्यानंतर ती एटीएम मशीनमध्ये तिचं डेबिट कार्ड टाकते आणि स्क्रीनवर पुढची प्रक्रिया पूर्ण करत असते. पण यानंतर फ्रेममध्ये जे काही दिसून येतंय ते फार मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये ही मुलगी मजेदार डान्स करताना दिसून येतेय. चारही दिशांना फिरून ही मुलगी अगदी बिनधास्तपणे डान्स स्टेप्स करताना दिसून येतेय. जोपर्यंत एटीएममधून पैसे येत नाहीत तोपर्यंत ही मुलगी एकापेक्षा एक डान्स स्टेप्स करते. इतकंच नव्हे तर तिने मजेदार एक्सप्रेशन्स सुद्धा दिले आहेत.
पाहा व्हिडीओ:
एटीएममधून जोपर्यंत पैसे येत नाहीत तोपर्यंत ही मुलगी डान्स करते आणि एटीएम मशीनमधून पैसे बाहेर आल्यानंतर ही मुलगी एटीएमला नमस्ते करत बाहेर पडते. हा प्रसंग एटीएममधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. या व्हिडीओमधील मुलीचा हा अनोखा अंदाज नेटिझन्सना खूपच आवडलाय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.
इन्स्टाग्रामवर ‘ghantaa’ नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत १२ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. तसंच या व्हिडीओमधील मुलीचा मजेदार डान्स पाहून नेटिझन्स अनेक मजेदार कमेंट्स करत तिचं कौतुक करताना दिसून येत आहेत. “मला सुद्धा असाच डान्स करायचाय”, “पगार मिळाल्याच्या आनंदाने ही मुलगी वेडी झाली असेल” अशा वेगवेगळे कमेंट्स या व्हिडीओवर दिसून येत आहेत.