Viral Video Girl Falls On Floor: डान्स करायचा तर बोल्डच हा जणू काही सोशल मीडियाचा अलीकडे नियमच झाला आहे. लग्न असुदे किंवा रील सगळीकडे बोल्ड मूव्ह्ज आणि गाण्यांचा बोलबाला आहे. आता या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये कधी कधी खरंच फार हिट पाहायला मिळते तर काहीवेळा अनेकांची फक्त फजितीच होते. असाच एक फजितीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहेत. आजूबाजूचं वातावरण पाहता हा एखाद्या लग्नातील व्हिडीओ असावा असा अंदाज आहे. जमलेल्या वऱ्हाडी मंडळींसमोर एक तरुणी आपल्या त्यांत मादक अदा दाखवायला जाते. गाणं सुरु होताच तिच्या स्टेप्स सगळ्यांना भुरळ घालताना पण इतक्यात ती अशी काही तोंडावर आपटते की त्यानंतर त्या तरुणीची काय अवस्था झाली असेल याचा विचारही करता येणार नाही.
भीगी भीगी रातों में.. या गाण्यावर तरुणीचा अत्यंत सेनश्युअल डान्सचा प्लॅन असावा म्हणूनच कदाचित तिने स्टेजवर पाणी ओतलेले असणार. पण हा प्लॅन तिच्याच अंगाशी आला. जमिनीवर सांडलेल्या पाण्यावरून तिचा पाय घसरला आणि जवळपास १०० लोकांसमोर ती तोंडावर आपटली. हा व्हिडीओ पाहून सुरुवातीला तुम्हाला कदाचित हसायला येईल. पण ती ज्या वेगात आदळते त्यावरून नक्कीच तिला दुखापत झाली असणार या विचाराने काळजीही वाटेल.
नातेवाईक बघतच बसले..
हे ही वाचा<< “आधी फ्रेंच किस केलं मग जीभ कापली अन्..” प्रसिद्ध मॉडेलने सांगितला पहिल्या डेटचा धक्कादायक किस्सा
दरम्यान, हा व्हिडीओ आता इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला तब्बल लाखभर व्ह्यूज आणि हजारो कमेंट व लाईक्स मिळाल्या आहेत. या तरुणीला या डान्सनंतर पियाची नव्हे तर देवाची आठवण नक्की आली असेल अशा कमेंट्स सुद्धा नेटकरी करत आहेत. नेटकऱ्यांनी तिच्या आत्मविश्वासाची सुद्धा दाद दिली आहे. कौटुंबिक कार्यक्रमात नातेवाईकांच्या समोर जिथे बोलायलाही लोकं कचरतात तिथे या तरुणीने डान्स करायला तयार होणं म्हणजे कमाल आहे असेही काही जण म्हणत आहेत.