Girl Bike Stunt Viral Video: आजकालची तरुणाई अनेकदा बाईकवर स्टंट करताना दिसते. बाईकवर स्टंट करणं हा काही ‘बच्चो का खेल’ नाही. स्टंट करताना छोटीशी चूकही जीवघेणी ठरू शकते. आता हे प्रकरण फक्त मुलांपुरतं मर्यादित नाही. तर मुलीही आता बाईकवर स्टंट करु लागल्या आहेत. विश्वास बसत नसेल तर सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात आपल्याला ‘पापा की परी’ धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक मुलगी रस्त्यावर हवेसारखी स्पोर्ट्स बाईक चालवताना दिसत आहे. मागेहून येणाऱ्या एका वाहन चालकाने हा व्हिडीओ रेकाॅर्ड केला आहे. स्पोर्ट्स बाईकवरुन स्टंट करणाऱ्या या मुलीने हेल्मेटही घातलेले नाही. विशेष म्हणजे, यादरम्यान तरुणी रस्त्यावर धोकादायकपणे बाईक फिरवत आहे. यादरम्यान अनेक दुचाकी आणि कार रस्त्यावरून जात असताना दिसत आहेत. यावेळी केव्हाही काही अनुचित परिस्थिती घडेल असे दिसून येते आणि काही क्षणातच असे घडते की, तुम्हालाही धक्का बसेल.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
US man reads with giant anaconda Snake shocking video Viral
बापरे! बिछान्यावर भल्यामोठ्या ॲनाकोंडा सापाला घेऊन झोपला अन्…; पाहा भयावह VIDEO
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
Leopard attacks Viral Video
‘त्याने लढून स्वतःचा जीव वाचवला…’ घराबाहेरच्या अंगणात बिबट्याने थेट श्वानावर केला हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Shocking video Groom sehra catches fire during photoshoot wedding video goes viral
VIDEO:”काही क्षणांसाठी आयुष्याचा खेळ करु नका” नवरदेवाला ग्रँड एन्ट्री पडली महागात; थेट फेट्याला आग लागली अन् पुढच्याच क्षणी…

थोड्याच वेळात या स्टंट करणाऱ्या मुलीची बाईक मागेहून येणाऱ्या एका दुचाकीला जोरदार धडकते आणि या मुलीच्या स्टंटमुळे मागील दुचाकीवरील दोघजण खाली आपटतात. मात्र, यावेळी मुलीला काहीही होत नाही. ती सरळ पुढे जाते. मात्र, तिच्या या धोकादायक स्टंटमुळे मागील दुचाकीवरील दोघांना गंभीर दुखापत झाली असावी, असे वाटते.

इथे पाहा व्हिडीओ

व्हिडीओ भारतातील नाही

हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ भारतातील नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी भारतीय नाही आणि इथल्या रस्त्यावर अशी कोणतीही घटना घडलेली नाही. या व्हायरल व्हिडिओवर valegrau062 चा वॉटरमार्क आहे. जे बाईकर्सचे चॅनल आहे आणि त्यात सर्व स्टंटचे व्हिडीओ समाविष्ट आहेत. हे सर्व व्हिडीओ ब्राझीलचे असल्याची माहिती या चॅनलवरून कळते. म्हणजेच या व्हायरल व्हिडिओचा भारताशी काहीही संबंध नाही.

Story img Loader