सोशल मीडिया हा अस एक प्लॅटफॉर्म आहे, ज्यावरती लोक काही ना काही व्हिडीओ शेअर करत असतात. यांपैकी काही व्हिडीओ हे खूपच मनोरंजक असतात, तर काही व्हिडीओमुळे आपल्याला खूप काही शिकायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांना रोतोरात प्रसिद्धी मिळाली आहे. सोशल मीडिया हे असे प्लॅटफॉर्म आहे जेथे लोकांचा त्यांच्यामधील टॅलेंट दाखवण्याची संधी मिळते. प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोक वाटेलत्या थराला जातात आणि काहीतरी विचित्रच करुन बसतात.
सध्या बालीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी एका हातात सुटकेस घेऊन स्कूटीवर मागे बसली आहे. यावेळी तिच्या एका हातात बॅग तर एका हातात बिअरची बॉटल दिसत आहे. एवढी मोठी सुटकेस घेऊन तिला नीट बसताही येत नाहीये तरीही ती बिअर पिण्यात व्यस्थ आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
हे दृश्य पाहून लोक आश्चर्यचकित होतात. विशेष म्हणजे तिनं हेल्मेटही घातलेलं नाहीये त्यामुळे तिच्यावर टीकाही होत आहे. बाली सारख्या पर्यटन स्थळावर लोक फिरायला येतात मात्र तिथल्या नियमांचं उल्लंघन करतात. निसर्गरम्य ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होऊन दुर्गंधी पसरते. निसर्गाची होणारी ही हानी टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे या तरुणीच्या कृत्यावर लोक संताप व्यक्त करत आहेत.हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत २ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “मी पण अशा व्यक्तीवर प्रेम केलं…” ट्रकच्या मागे लिहली भन्नाट शायरी; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
व्हायरल व्हिडिओवर लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
व्हायरल झालेल्या व्हिडिओवर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, “शॉक बडी चीज है पण नियमांचं काय?”. आणखी एका यूजरने लिहिले की, ‘अशा लोकांना त्यांच्या जीवाची पर्वा नसते.’ त्याचवेळी दुसर्या यूजरने लिहिले की, ‘छंदासाठी सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केले गेले.’