Viral video: आजकाल सोशल मीडियावर ‘फ्यूजन डिश’ हा एक नवीन फूड ट्रेंड बनला आहे. लोक रोज नवनवीन रेसिपी ट्राय करत आहेत, त्या सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. एखादा पदार्थ आवडतो म्हणजे त्याची चव आवडते आणि ती दुसऱ्या कोणत्या पदार्थासोबत अधिक चविष्ट लागेल याचा विचार होतो. जगभर जे फ्यूजन फूड मिळतेय त्यामागे हाच विचार मुख्य असतो. त्यातून अनेक चवीचे संगम घडलेत. मात्र, काही लोक खूपच विरुद्ध पदार्थ एकत्र करून खातात. दरम्यान, एका महिलेनंही असंच काहीसं केलंय. तिने चक्क समुद्राच्या पाण्यात ब्रेड, चीज बुडवून खाल्लं आहे. हा अजब पदार्थ पाहून खवय्ये मात्र फारच संतापले आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी बोटीमध्ये उभी असलेली दिसत आहे, तिच्या आजूबाजूला पार्टी सुरू असल्याचं दिसत आहे. यावेळी ती तिच्या बाजूला असलेले पदार्थ घेते. यामध्ये सुरुवातीला ती एक ब्राऊन ब्रेड घेते आणि समुद्राच्या पाण्यात बुडवते, त्यानंतर ती ब्रेडवर सर्व भाज्या टाकते. नंतर ती चीजसुद्धा समुद्राच्या पाण्यात बुडवते आणि दोन्ही एकत्र खाते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल. तरुणीने हे उत्साहाच्या भरात, वेगळं काही ट्राय करण्याच्या हेतून केलं असावं. मात्र, बघताना ते फारच विचित्र दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> गुजरातमध्ये रस्त्यावर दिसेल त्या तरुणीला, महिलेला रोड रोमिओची शिवीगाळ; संतापजनक VIDEO व्हायरल
हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुम्हालाही संताप आला असेल. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही या तरुणीला ट्रोल करत आहेत. व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत अशा लोकांचं काय करायचं अशीही प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. हा व्हिडीओ @italyinsidersandpuglia या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्हूज आणि लाईक्स मिळत आहेत.