कोरोना काळापासून जग हळहळू शाकाहारी होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मासं आणि मासे खाण्याऐवजी फळे आणि भाज्या खाण्यास पसंती देत आहेत. परंतु तरीही जगात अशा लोकांची कमतरता नाही जे मासांहार आवडीने करतात. पण आपण साधारणपणे फक्त चिकन, मटण आणि मासे खाताना पाहिले असेल, पण जगात असे काही देश आहेत जिथे लोक इतर प्राण्यांचे मासं खातात याशिवाय साप, विंचू आणि किडे आवडीने खातात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक तरुणी चक्क झुरळापासून एक रेसिपी बनवून खाताना दिसत आहे, ही रेसिपी पाहतानाच खूप किळस येते.
या व्हिडिओमध्ये एक तरुणी कांदा आणि मिरचीत फ्राय केलेले झुरळ टोमॅटो-मिरचीच्या चटणीसह आवडीने खाताना दिसत आहे. सहसा लोक टोमॅटो-मिरचीच्या चटणीसोबत मोमोज खाताना दिसतात, पण इथे तरुणीने चक्क झुरळं खाल्ली. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणी आधी कांदा आणि मिरची तेलाच फ्राय करते त्यानंतर त्यात झुरळं टाकून तळते आणि नंतर ही रेसिपी प्लेटमध्ये सर्व्ह करते. यानंतर एका बाऊलमध्ये ती लाल मिरची आणि टोमॅटोपासून बनवलेली चटणी घेते. यानंतर दोन – तीन झुरळ उचलून ती चटणीत बुडवते आणि खाते. जे पाहून कोणालाही उलटी येईल.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर infavoritewild नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत १ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर ४ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केला आहे.
त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने गंमतीत लिहिले की, ‘चीनी लोक कधीच उपाशी राहणार नाहीत, कारण ते काहीही खातात’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘माझ्या घरी खूप झुरळे आहेत, तेही घेऊन जा आणि तळून खा’, तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की, ‘ही क्लिप बनावट आहे. ते अशाप्रकारे घाणेरडे किडे खात नाहीत’.