Viral video: सोशल मीडियावर दररोज हजारो, लाखो व्हिडीओ शेअर होत असतात. व्हिडीओ स्क्रोल करताना कधी-कधी असे व्हिडीओ डोळ्यांसमोर येतात, जे पाहून युजर्सला हसू आवरता येत नाही. म्हणजेच सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचं उत्तम माध्यम बनलं आहे. आज तुमचा मूड ऑफ असेल तर आम्ही तुमच्यासाठी असाच एक व्हिडीओ घेऊन आलो आहोत, जो पाहिल्यानंतर तुम्ही पोटधरून हसाल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर सध्या एका मुलीचा स्कुटी चालवतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्सना हसूही आवरत नाहीये. अशाप्रकारे गाडी चालवणाऱ्या मुलींना सोशल मीडियावर पापा की परी म्हणून ट्रोल केलं जातं. सोशल मीडियावर काही व्हिडीओ तर इतके मजेशीर असतात की ते पाहून हसू आवरत नाही; तर काही व्हिडीओ इतके भावूक करून जातात की नकळत डोळ्यातून पाणी येतं. सध्या सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोटधरून हसाल.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी स्कुटीवर एका मेडिकल स्टोअरमध्ये कशी प्रवेश करते हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कसे लोक मेडिकल स्टोअरच्या काउंटरवर उभे आहेत आणि एक मुलगी काउंटरवरून लोकांना औषधे देत आहे. त्यानंतर स्कुटीवरून आलेल्या एका मुलीने मेडिकल स्टोअरचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि तिथे उभ्या असलेल्या लोकांना उडवले, त्यानंतर ती मुलगीही स्कुटीवरून खाली पडली. त्यामुळे मेडिकल स्टोअर्सच्या काउंटरसह अनेक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युजर्स त्यावर विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कुस्तीचा असा डाव कधीच पाहिला नसेल; अवघ्या ४० सेकंदात धोबीपछाड, बेळगावमधल्या जंगी कुस्तीचा Video Viral

@Cute_girl__29 नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत ५४ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी व्हिडीओला लाइकदेखील केले आहे. अशा परिस्थितीत युजर्स व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत. एका युजरने लिहिले… ही सर्व चूक वैद्यकीय लोकांची आहे, जर तुम्ही रस्त्याच्या कडेला मेडिकल बनवले तर हेच होईल. दुसऱ्या युजरने लिहिले.. जर तुम्हाला गाडी कशी चालवायची हे माहीत नाही, मग तुम्ही का चालवता?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl enters the medical store with a scooter and tramples the people present there funny video goes viral srk