सोशल मीडियावर डान्सचे मजेदार व्हिडीओ दिवसेंदिवस व्हायरल होत असतात. या व्हिडीओजमध्ये अनेकवेळा प्रतिभावान लोकांच्या डान्स स्टेप्स पाहून आपण आश्चर्यचकित होतो, तर कधी कधी डान्स करताना लोकांसोबत असा काही प्रकार घडतो की, ज्यामुळे त्यांची फजिती होते. परंतु हे असे व्हिडीओ युजर्ससाठी खूप मनोरंजक असतात. लोकं अशा प्रकारच्या फनी व्हिडीओची खूप मजा घेतात आणि आपल्या मित्रांना देखील ते पाठवत असतात. सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरून हसाल, हे मात्र नक्की.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओ आपण पाहू शकतो, गच्चीवर दोन मुली एकमेकींसमोर उभ्या असलेल्या दिसून येत आहेत. एक मुलगी दुसऱ्या मुलीला काही डान्स स्टेप्स शिकवताना दिसून येत आहे. गच्चीवर थोडं फार पाणी जमा झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येतंय. एक मुलगी दुसऱ्या मुलीला एक डान्स स्टेप करून दाखवते. समोरच्या मुलीचे डान्स स्टेप्स पाहून दुसरी मुलगी कॉपी करत डान्स करण्याचा प्रयत्न करते. तिच्या या डान्स स्टेप्सने लोकं आश्चर्यचकित तर होतात, परंतु एका वेगळ्याच कारणाने.डान्स शिकण्याच्या नादात तिचा पाय घसरतो आणि धपकन जमिनीवर पडते. हे पाहून समोरची मुलगी ताबडतोब तिच्या मदतीसाठी पुढे येते.
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : जेव्हा तीन खतरनाक किंग कोब्रांमध्ये बैठक होते…VIRAL VIDEO पाहून लोक म्हणाले, “गंभीर चर्चा सुरूये”
bhutni_ke_memes नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूपच आवडलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह नेटकऱ्यांना आवरता येत नाहीय. लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना त्यांचं हसू आवरणं कठिण होत आहे. याच कारणामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. आतापर्यंत जवळपास २७०० लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसंच शेअर करणाऱ्यांची संख्या सुद्धा काही कमी नाही.