Viral video: सोशल मीडियावर दररोज हजारो लाखो व्हिडीओ शेअर होत असतात. व्हिडिओ स्क्रोल करताना कधी-कधी असे व्हिडिओ डोळ्यांसमोर येतात, जे पाहून यूजर्सला हसू आवरता येत नाही. म्हणजेच सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचं उत्तम माध्यम बनलं आहे. आज तुमचा मूड ऑफ असेल तर आम्ही तुमच्यासाठी असाच एक व्हिडीओ घेऊन आलो आहोत, जो पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरून हसाल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
सोशल मीडियावर सध्या एका मुलीचा स्कुटी चालवतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्सना हसूही आवरत नाहीये. अशाप्रकारे गाडी चालवणाऱ्या मुलींना सोशल मीडियावर पापा की परी म्हणून ट्रोल केलं जातं. सोशल मीडियावर काही व्हिडीओ तर इतके मजेशीर असतात की ते पाहून हसू आवरत नाही; तर काही व्हिडीओ इतके भावूक करून जातात की नकळत डोळ्यातून पाणी येतं. सध्या सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोटधरून हसाल.मुली काहीतरी हटके करायला गेल्या आणि तो जर त्यांचा प्रयत्न फसला तर नेटकरी मुलींची चांगलीच थट्टा करतात. पापा की परी म्हणून चिडवतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील मुलींनाही नोटकऱ्यांनी पापा की परी असं नाव दिलंय. त्याला कारणही तसंच आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका महिलेनं अक्षरश: एका मागोमाग ४ गाड्यांना धडक दिली आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी स्कुटीवर येते आणि तिचा तोल जातो यावेळी ती पार्क केलेल्या सगळ्या बाईक्स स्कूटींना धडक देते. यावेळी सगळ्या गाड्या खाली पडलेल्या दिसत आहेत. सुदैवानं या महिलेला काही दुखापत झाली नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युजर्स त्यावर विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत.
पाहा व्हिडीओ
khatri_womenia नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत ५४ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी व्हिडीओला लाइकदेखील केले आहे. अशा परिस्थितीत युजर्स व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत. एका युजरने लिहिले… ही सर्व चूक रस्त्यात गाडी लावणाऱ्या लोकांची आहे. दुसऱ्या युजरने लिहिले.. जर तुम्हाला गाडी कशी चालवायची हे माहीत नाही, मग तुम्ही का चालवता?