Viral video: सोशल मीडियावर सध्या रील्सचा पूर आलाय. कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गेलात की, तुम्हाला सर्वांत आधी रील्स दिसतात. आपली क्रिएटीव्हीटी लोकांपर्यंत पोहोचावी आणि आपले फॉलोअर्स वाढावेत, असा या रील्स बनवणाऱ्यांचा हेतू असतो. रील्सना मिलियनमध्ये व्ह्यूज असतात. या व्ह्यूजसाठी काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न युजर्सचा असतो, त्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे रील्स बनवतात. रील्ससाठी काही जण तर अगदी जीवही धोक्यात घालतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, एका महिलेला समुद्रातील झोक्यावर उभा राहून डान्स करणं चांगलंच महागात पडलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्याला माहितीये आता पर्यटन स्थळांवर किती विकास झालाय. पर्यटकांसाठी नव नव्या गोष्टी आता पाहायला मिळतात. पर्यटकही त्याचा पुरेपूर आनंद घेतात. मात्र उत्साहाच्या भरात एखादी गोष्ट ट्राय करण्याआधी त्याचा अंदाज घेणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं ते पाहा. समुद्र किनाऱ्यावर एका महिलेचा उत्साह तिला चांगलाच नडला आहे. रिल बनवण्यासाठी ती समुद्रातील झोक्यावर झोका घेण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तिचा हा प्रयत्न चांगलाच फसला. ती थेट समुद्राच्या पाण्यात पडली.

निळ्या आणि पांढऱ्या कपड्यांमध्ये महिला खूप सुंदर दिसत आहे. मात्र, पुढे दिसतं की डान्स करतानाच तरुणीचा पाय घसरतो आणि ती समुद्रात पडते. हे पाहून नेटकरीही हैराण झाले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> अमेरिकेत शिक्षक शिकवत असताना विद्यार्थ्यानं काय केलं पाहा; सोशल मीडियावर VIDEO ची तुफान चर्चा

गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. तरुण-तरुणांपासून अनेकांना या सोशल मीडियाने वेड लावलं आहे असंच म्हणायला हरकत नाही. या रिलमुळे यूजर्स पैसे कमवू शकतात. त्यामुळे बघावं तिकडे तरुणांपासून मोठ्यापर्यंत लोक रील्स बनविताना दिसतात.  मात्र काही लोक लाइक्स आणि व्ह्यूजच्या शर्यतीत आपला जीव धोक्यात घालण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरीही संताप व्यक्त करत आहेत. अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.