जोडीदार शोधण्यासाठी सोशल मीडियावर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. डेटिंग ॲपद्वारे तुम्ही अनोळखी व्यक्तींशी संवाद साधून त्यांना ओळखून घेण्याचा प्रयत्न करू शकता. पण, अनेकांना डेटिंग ॲप हे सोईस्कर वाटत नाहीत म्हणून ते त्यांचा उपयोग करण्यास बऱ्याचदा नकार देतात. तुम्ही आतापर्यंत अनेक डेटिंग किंवा मॅट्रिमोनिअल प्लॅटफॉर्मवरून रेशीमगाठ बांधली आदी गोष्टी ऐकल्या असतील. पण, आज रेडिट (Reddit) ॲपने भारतीय तरुणीची एका तरुणाबरोबर रेशीमगाठ बांधली आहे.

भारतीय तरुणी जी सध्या ऑस्ट्रेलियात राहते आहे, तिने तिची गोष्ट Reddit वर शेअर केली आहे. तरुणीने पोस्टमध्ये म्हटले आहे की, ती भारतीय रेडिट (Reddit) ॲपवर बरीच सक्रिय असायची. तसेच या ॲपवर बऱ्याच मुलांकडून मैत्रीसाठी मेसेज (डायरेक्ट मेसेज म्हणजेच DM) यायचे. तर एकदा तरुणीने तिचा सेल्फी ॲपवर पोस्ट केला. हा सेल्फी पाहताच तिला एका भारतीय तरुणाने एक सुंदर मेसेज केला आणि हा मेसेज दोघांची नकळत रेशीमगाठ जोडून गेला. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या भारतीय तरुणीची गोष्ट तुम्हीसुद्धा पोस्टमधून पाहा…

हेही वाचा…VIDEO: घरकाम करण्यासाठी आल्या अन् एक तास अडकल्या लिफ्टमध्ये; कॉल लागेना, इमर्जन्सी बटणही काम करेना; पाहा कशी झाली सुटका

पोस्ट नक्की बघा…

व्हायरल पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणीने रेडिट (Reddit) ॲपवर सेल्फी पोस्ट करताच एक भारतीय तरुण तिला मेसेज करतो. तसेच मेसेजचे हळूहळू कॉलमध्ये रूपांतर झाले. दोघांनाही रिलेशनशिपमध्ये येण्यात फारसा रस नव्हता. दोघांचाही वाईट भूतकाळ एकमेकांशी शेअर करत हळूहळू त्यांच्यातील कनेक्शन मजबूत होऊ लागले. त्यानंतर दोघांची भारतात भेट झाली आणि त्यांची ही अनोखी प्रेमाची गोष्ट यशस्वी झाली; जी तिने आज सर्व युजर्सबरोबर शेअर केली आहे.

सोशल मीडियावर ही पोस्ट ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या भारतीय तरुणीच्या @Aussiebredgirl या रेडिट (Reddit) ॲपवरून शेअर करण्यात आली आहे. ही अनोखी गोष्ट पाहून अनेक युजर्स विविध प्रश्न विचारताना दिसले. अनेक युजर्स ‘त्याने पहिला मेसेज काय केला हे जाणून घेण्यात उत्सुक आहेत’, तर काहींनी ‘तुम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिप कसं सांभाळता’ असेही विचारले; तर काहींनी फक्त या जोडप्याचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. एकूणच सोशल मीडियावर या अनोख्या गोष्टीने अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.