Viral video: लहान मुलींपासून वयस्कर महिलांची सुरक्षा ही जगभरातील मोठी चिंता आहे. देश कुठलाही असो तरुणी असो वा विवाहीत महिला यांच्यासोबत पुरुषांचे गैरवर्तनचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी अनेक कठोर कायदे करण्यात आले पण अजूनही नराधम वेठणीस येतं नाही आहेत. त्यामुळे अशा नराधमांपासून तरुणींने स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी त्यांना कराटे आणि बचावासाठी प्रशिक्षण देण्यात येतं आहे. प्रत्येक मुलीला आपला बचाव करता यावा म्हणून हे किती जरुरी आहे, हे दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
देशभरात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोलकाता बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेले असताना बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. पण बिहार येथील एका तरुणीने देशभरातील तरुणींना नवा आदर्श घडवून दिला आहे. एका तरुणाला मुलीसोबत फ्लर्ट करणे चांगलेच महागात पडले आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही या तरुणीच्या धाडसाचं कौतुक कराल.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुलगी काठीने मारहाण करताना दिसत आहे. मुलीच्या हातात एक जाड आणि लांब काठी आहे, ज्याने ती मुलाच्या हातावर, कंबरेवर आणि पायावर वाईट रीतीने वार करताना दिसत आहे, असे दिसते की ती एकाच वेळी गेल्या अनेक वर्षांचा बदला घेत आहे. शेजारी एक जमाव उभा आहे जो मुलीला प्रोत्साहन देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो बऱ्याच दिवसांपासून मुलीचा छळ करत होता आणि मुलीला येता जाता अश्लील स्पर्श आणि अश्लील कमेंटही करत होता, असे सांगण्यात येत आहे. यावेळी तरुणीने तरुणीने मास्टरमाईंडने सगळा प्लॅन केला. गावकऱ्यांनी त्या मुलाला पकडून पीडित मुलीच्या स्वाधीन केले, त्यानंतर मुलीने त्याला चांगलीच अद्दल घडवली. तरुणीने एवढी धुलाई केली की आता तो यापुढे कोणत्याही मुलीला छेडण्याचे धाडस करणार नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Kulhad Pizza Couple Video: कुल्हड पिझ्झा कपल पुन्हा एकदा चर्चेत, सोशल मीडियावर व्हिडिओ झाला व्हायरल
हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत ७५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर अनेकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया युजर्सही व्हिडिओबाबत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले…या मुलीला बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेची ब्रँड ॲम्बेसेडर बनवायला हवी. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… बीट इट हार्ड. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… अशा लोकांसाठी हा एकमेव उपचार आहे.