सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ तुम्हाला हसवतात तर काही तुम्हाला धडा शिकवतात. आजकाल, प्रसिद्ध होण्यासाठी लोक अनेक प्रकारचे स्टंट करत असता. यामध्ये काही स्टंट असे असतात की ते जीवावरही बेतू शकतात. कधी-कधी लोक नियमांकडे दुर्लक्ष करून असे व्हिडिओ बनवतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगी साडी नेसून चालत्या बाईकवर उलटी बसून मागून येणाऱ्या बाईकस्वाराला फ्लाइंग किस देत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तर नेटकरी हा व्हिडीओ पाहू संतापले आहेत.
चालत्या बाईकवर फ्लाइंग किस
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला बाईकवर बसलेली आहे. मात्र ही तरुणी स्टंटबाजी करण्यासाठी साडीवर चक्क उलटी बसली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बाईकवर बसलेली एक महिला पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीस्वाराला फ्लाइंग किस देताना दिसत आहे. अशाप्रकारे ती एका कुणाला नाही तर रस्त्यानं येणाऱ्या जाण्याऱ्या प्रत्येकाला ती फ्लाइंग किस देत हातवारे करत आहे. यावेळी एका बाईकस्वाराने हातवारे करून तरुणीला त्याच्या दुचाकीवर बसण्यास सांगितले. पण महिला हातवारे करून नकार देते. ही महिला ज्या दुचाकीवर बसली होती त्या दुचाकीला नंबर प्लेटही नाहीये. तसेच, महिलेला फ्लाइंग किस देऊन तिथून जाणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीच्याही दुचाकीवर नंबर प्लेट दिसत नाहीये. तिघांपैकी कोणीही हेल्मेटही घातलेले नव्हते.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या महिलेच्या या व्हिडीओवर लोकांच्या खूप प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिले की, तरुणीने मर्यादा ओलांडली आहे. तर दुसऱ्या युजरने लिहले आहे की, प्रशासनाने डोळे मिटले आहेत का.’ यानंतर या व्यक्तीने बिहार पोलिस आणि पाटणा पोलिसांनाही टॅग केले आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> मुबंईकरांनो सावधान! बसने प्रवास करत असाल तर पोलिसांचा ‘हा’ VIDEO एकदा नक्की बघा…
काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशी सुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. वाहतुकीचे नियम मोडून रस्त्यावर वाहनांची भन्नाट स्टंटबाजी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
@ChapraZila नावाच्या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. वारंवार अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, मात्र तरीही तरुणाई यातून धडा घेताना दिसत नाही.