आजकाल जीवनशैली तणावग्रस्त झाल्याने त्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक पर्याय आजामावले जातात. ब्युटीपार्लरमध्येही अनेक महागड्या मसाज पॅकेजची आमिष दाखवली जातात. परंतू पुरेशी काळजी आणि स्वच्छतेची काळजी न घेतल्यास हेच उपचाअर बूमरॅंगसाराखे पलटूदेखील शकतात. ब्युटी पार्लरमध्ये अनेक प्रकारचे स्पा उपलब्ध आहेत. अशांपैकी एक म्हणजे फिश फूट स्पा. मात्र हेल्थ एक्स्पर्ट्च्या माहितीनुसार, फिश फूट स्पामुळे एचआयव्ही आणि हेपेटायसिस सी सारख्या आजारांचा धोका बळावू शकतो. फिश टॅंकमधील पाणी वेळोवेळी न बदलल्यास एका कस्टरमकडून दुसर्या कस्टमरकडे इंफेक्शन पसरू शकते.
जर एखादा कस्टमर एचआयव्ही आणि हेपेटायटिस बाधित असतील तर हे इंफेक्शन पसरू शकते. असाच एक प्रकार आता समोर आला आहे. फिश स्पा नंतर एका महिलेला पायांना इनफेक्शन झालं अन् तिच्या पायाची पाचही बोटं कापावी लागली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये राहणारी एक मुलगी पायांची स्वच्छता करण्यासाठी ‘फिश स्पा’मध्ये गेली. परंतू हे तिला चांगलेच महागात पडले. तिथून आल्याच्या काही आठवड्यानंतर तिच्या पायाला जखम झाली. यानंतर ती नेहमीच आजारी राहत होती. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर कळाले की, तिच्या पायांवर इन्फेक्शन झाले आहे. यामुळे तिचे हाड खराब होत होते. यानंतर डॉक्टरांनी हळुहळू तिच्या उजव्या पायांचे पाचही बोट कापले.
एक-एक करुन कापावी लागली पाच बोटं
सुरुवातीला डॉक्टरांनी तिचा अंगठा कापण्याचा निर्णय घेतला. तेव्हा विक्टोरियाला वाटले की यानंतर आता तिचे आयुष्य पुर्णपणे नॉर्मल होईल. परंतू असे झाले नाही. पुढच्या एका वर्षात तिच्या अजून एका बोटाला अल्सर झाला. यानंतर डॉक्टरांनी ते बोटही कापले. यानंतर तिची तिन्हीही बोट याच कारणांमुळे कापावी लागली. यानंतर डॉक्टरांनी हळुहळू तिच्या उजव्या पायांचे पाचही बोट कापली.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – तुम्ही पण किचनमध्ये मोबाईल वापरता का? होऊ शकतो सिलेंडरचा स्फोट, पाहा धक्कादायक VIDEO
आता दूस-यांना अलर्ट करतेय
आता विक्टोरिया दूस-या लोकांना फिश स्पाविषयी अलर्ट करत आहे. आशियामध्ये फिश फूट स्पा हा प्रकार लोकप्रिय आहे. मात्र अमेरिकेतील काही राज्यांमध्ये त्यावर बॅन आहे. जखमा पुरेशा भरलेल्या नसतील तर त्यामुळे इंफेक्शनचा धोका वाढू शकतो.