Viral Video: सोशल मीडियावर दर दिवशी असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ आपल्याला हसवतात, तर काही व्हिडीओ खूप काही मोलाचा संदेश देऊन जातात. यात काही व्हिडीओ असे असतात जे पाहिल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की, या जगात खरंच माणुसकी शिल्लक आहे का? तर, काही व्हिडीओतून खऱ्या माणुसकीचे दर्शनदेखील आपल्याला घडतं. सध्या सोशल मीडियावर एक असाच माणुसकी दाखवणारा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात दोन मुली अगदी निस्वार्थपणे एका अपंग माणसाची मदत करताना दिसतायत.

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान गाजतोय. या व्हिडीओत एक अपंग माणूस एस्केलेटरजवळ उभा असताना दिसला. हातात कुबड्या घेऊन तो माणूस एस्केलेटर चढण्याच्या प्रयत्न करत होता, पण त्याला काही केल्या ते जमेना. कितीतरी वेळ खाली उभं राहिल्यानंतर मागून दोन मुली येतात आणि त्या एस्केलेटरवर चढून पुढे जातात.

हेही वाचा… ‘दिलबर दिलबर…’, स्टेजवर शाळेतील विद्यार्थ्याचा भन्नाट डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “मागे बसलेल्या मॅडम…”

पुढे गेल्यावर लगेच त्या दोघींना लक्षात येतं की मागे राहिलेला माणूस अपंग आहे आणि त्याला एस्केलेटरवर चढायला त्रास होतोय. हे लक्षात येताच एस्केलेटरवर चढलेल्या मुली चालत्या एस्केलेटरवरून पुन्हा खाली उतरतात आणि त्याची मदत करण्यास धावून येतात. खाली उतरून त्या माणसाला दोघी मदत करतात. दोघींच्या गळ्यात हात घालून तो अपंग माणूस कसाबसा एस्केलेटर चढतो.

हा व्हिडीओ @hebaghbhava या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “खूप छान वाटलं शेवट पाहून”, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हिडीओला तब्बल १.७ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… भांडी घासण्याची ही कोणती पद्धत? महिलेचा जुगाडू VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “या काकींना…”

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने प्रतिक्रिया देत लिहिलं, “गर्व आहे अशा मुलींवर मला, खूप छान ताई”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “म्हणून माणुसकी टिकून आहे आणि अजूनही जिवंत आहे”; तर एक जण म्हणाला, “शेवटी विषय संस्कारांचा होता.”

हेही वाचा… स्टेजवर महिलेचा डान्स सुरू असताना काकांनी केलं ‘असं’ काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का

दरम्यान, याआधीही माणुसकीचं दर्शन घडवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झाले आहेत. सध्या या व्हिडीओची चर्चा सर्वत्र सुरू आहे.