Fitness Model Workout Video Viral : पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी व्यायामशाळेत जाऊन घाम गाळावा लागतो. शरीर मजबूत करण्यासाठी वर्कआऊट करताना नवनवीन प्रयोग करावे लागतात. रोजच्या दैनंदिन जीवनात व्यायाम करणं ही सर्वांसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी चांगल्या फिटनेसची गरज असते. एका तरुणीनेही जिममध्ये कंबर कसून जबरदस्त फिटनेस तयार केलं आहे. प्लॅंक हा व्यायामाचा खूप महत्वाचा प्रकार आहे. जास्तीत जास्त वेळ प्लॅंक केल्याने शरीरातील फॅट बर्न होण्याचं प्रमाणं वाढतं. पण या तरुणीने नादच केला आहे. कारण तरुणीने पाठीवर लोखंडी प्लेट्स नाही तर चक्क ट्रकचे तीन टायर ठेवून प्लॅंक केल्याचं एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

@imkavy नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. प्लॅंक करत असताना त्या तरुणीच्या पाठीवर दोन टायर ठेवलेल असतात. त्यानंतर काही सेकंदांच्या आत दोन व्यक्ती तिच्या पाठीवर आणखी एक टायर ठेवतात. तरुणीने तीन मोठ्या टायरचं वजन पाठीवर घेत प्लॅंक केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, ‘प्लॅंक होल्ड करण्याचं सर्वात कठीण आव्हान’. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याने १४ मिलियनहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत.

नक्की वाचा – पॅसिफिक महासागरात सर्फिंगला गेलेल्या तरुणाला सापडला ‘हा’ दुर्मिळ मासा, सर्वांना चकीत करणारा व्हिडीओ व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

तर १ मिलियनहून अधिक लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. तरुणीची व्यायाम करण्याची पद्धत पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी जबरदस्त प्रतिक्रिया देत या तरुणीचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने म्हटलं, अरे देवा! खूप शक्तीशाली. तर दुसरा नेटकरी म्हणाला, किती जबरदस्त, मला तर विश्वासच बसत नाही. तसंच अन्य एकाने प्रतिक्रिया देत म्हटलं, स्ट्रॉंग कोअर, स्ट्रॉंग बॅक.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl holds 3 truck tyres on her back to do plank exercise fitness model workout video stunned people nss