दिवसाढवळ्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांत दिवसेंदिवस वाढच झाल्याचे दिसून येत आहे. या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यात काही केल्या महिला आणि लहान मुलींवरील अत्याचार काही कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. असाच एक भयंकर प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. राजस्थानमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका भयानक व्हिडिओमध्ये एक पुरुष एका तरुण मुलीशी जबरदस्तीने लग्न करताना दिसत आहे.
आजकाल पाहायला गेलं तर मुली कुठेच सुरक्षित नाही, पाळण्यातल्या मुलीपासून वद्ध महिलेलाही नराधम सोडत नाहीत. अशातच आणखी एक संतापरजनक घटना समोर आली आहे. राजस्थानचे वाळवंट म्हंटला जाणारा जैसलमेर जिल्हा सध्या एका धक्कादायक घटनेमुळे चांगलाचं चर्चेत आला आहे. १ जून रोजी शहरात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ चित्रपटातील एखाद्या सीनपेक्षा कमी नाही. एक तरुण एका मुलीला उचलून घेऊन आगीभोवती फिरत आहे. एक महिला त्याला असे करण्यापासून थांबवताना दिसते, परंतु मुलगा सर्व फेऱ्या पूर्ण करुन मुलीला सोडून जातो. या घडामोडीनंतर पोलिसांनी कारवाई करून मुख्य आरोपीला अटक केली, तर उर्वरित आरोपी फरार आहेत. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका भयानक व्हिडिओमध्ये एक पुरुष एका तरुण मुलीशी जबरदस्तीने लग्न करताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video: माकडानं घेतलेला चष्मा स्मार्ट महिलेने असा मिळवला, महिलेच्या चलाकीचं सोशल मीडियावर कौतुक
मालीवाल यांनी राजस्थान सरकारला या प्रकरणी लक्ष घालून त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरीही संतापले आहेत.