Zomato Container Fees Controversy: झोमॅटो आणि स्वीगी सारखे प्लॅटफॉर्म हे पावसाळ्याच्या दिवसात अनेकांसाठी देवदूतासारखे कामी येत आहेत. पण काही वेळा तुमच्याही लक्षात आले असेल की आपण मुळात जेव्हा त्या हॉटेलमध्ये जाऊन जेवतो तिथल्या पदार्थांचे दर हे ऍपवर खूपच वाढवलेले असतात. काही वेळा तर डिस्काउंट कुपन वापरूनही अधिकचे पैसे मोजावे लागतात. अर्थात डिलिव्हरी शुल्क किंवा डिलिव्हरी पार्टनरचा खर्च यासाठी काही अंशी वाढलेले दर ग्राहकही समजून घेतात. पण अलीकडेच एका प्रकरणात झोमॅटोने ऑर्डरमध्ये असे काही शुल्क जोडले होते जे बघून तुमचाही संताप होईल. खुशबू ठक्कर या तरुणीने आपला हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आह.

खुशबूने आपल्या झोमॅटो ऑर्डरच्या बिलाचा फोटो शेअर करत लिहिले की, “झोमॅटोने तीन वस्तूंच्या डिलिव्हरीसाठी १८० रुपये घेतले पण त्यात त्या पदार्थांच्या डिलिव्हरीसाठी वापरलेल्या डब्यांचे सुद्धा अतिरिक्त ६० रुपये जोडण्यात आले आहेत. हे पूर्णपणे चुकीचे आहे. ” तिने तिच्या पोस्टमध्ये झोमॅटो आणि झोमॅटो केअरला टॅग करून या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण मागितले होते.

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
cutest puppies following traffic rules
Viral Video : ही चाल तुरुतुरु…! रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लांना पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले, “फक्त अशी साथ…”
Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’
Young girl harassed foreign tourist for a reel dancing in public place video viral on social media
रीलसाठी ओलांडली मर्यादा! तरुणीने डान्स करता करता परदेशी व्यक्तीबरोबर केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकरी संतापले
Police Create Reel with Colleagues
पोलीस अधिकाऱ्याने सहकाऱ्यांबरोबर बनवली Reel, नेटकऱ्यांचे जिंकले मन, पाहा Viral Video
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच

याबाबत आता झोमॅटोने उत्तर देत आपली बाजू स्पष्ट केली आहे. “कंटेनरचे (डब्याचें) शुल्क रेस्टॉरंटकडून आकारले जाते. आणि इतर कर हे अन्नाच्या प्रकारावर आधारित ५% ते १८ % पर्यंत बदलू शकतात, नफ्यासाठी काही वेळा पॅकेजिंग शुल्क रेस्टॉरंट भागीदारांद्वारे सेट केले जाते, यात झोमॅटो तर्फे शुल्क आकारले जात नाहीत.” असे उत्तर झोमॅटोतर्फे ट्वीटमध्ये देण्यात आले आहे.

हे ही वाचा<< बाईक चालवताना डोळ्यात पावसाचं पाणी जातं म्हणून लावलं डोकं! बघून म्हणाल “मुंबईचा पाऊस – 0; दादाचा जुगाड- 1”

दरम्यान हा वाद सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी खुशबूच्या ट्वीटचे समर्थन करत ग्राहकांना अतिरिक्त खर्च न करता कंटेनर पुरविण्याची जबाबदारी रेस्टॉरंटची असली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. तर काहींनी आपणच ऑर्डर करण्याच्या आधी पूर्ण शुल्क तपासायला हवे होते. ते जर नंतर जोडले गेले असेल तर तक्रार करण्याला अर्थ आहे जर तुम्हाला आधीच माहित असूनही तुम्ही ऑर्डर करत असाल तर मग झोमॅटोची त्यात काही चूक वाटत नाही असेही काहींनी म्हटले आहे.

तुमचं या वादावर काय मत आहे हे कमेंट करून कळवा.