Viral Video : सगळ्या देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून शंकराला “महादेव” असे संबोधले जाते. महादेवाची पूजा तुम्ही कधीही करू शकता, पण सोमवार हा त्यांच्या पूजेसाठी सगळ्यात उत्तम दिवस मनाला जातो. अनेक शिवभक्त सोमवारी उपवास करतात, तर काही मंदिरात जातात आणि शिवलिंगावर दूध, पाणी, बेल अर्पण करून मनोभावे पूजा करताना दिसून येतात. तसेच श्रावण महिना हा शिवपूजनासाठी महत्वाचा मानला जातो. सर्व ठिकाणी महादेवांची पूजा ही त्यांचे प्रतीक असलेल्या ‘शिवलिंग’ यांच्या स्वरूपात केली जाते; तर आज सोशल मीडियावरसुद्धा असंच काहीसं पहायला मिळालं आहे. सोशल मीडियावर एका शिवभक्ताने बर्फापासून एक खास शिवलिंग तयार केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ एका तरुणीच्या घरातला आहे. तरुणी पूजेसाठी हे खास शिवलिंग तयार करते आहे. तरुणीने शिवलिंग तयार करण्यासाठी पाणी, स्टीलची वाटी, टोप प्लास्टिकच्या ट्रेमध्ये ठेवते आणि काही वेळानंतर ती प्रत्येक भांड्यातून बर्फ बाहेर काढते आणि एका टेबलावर शिवलिंगासारखे दिसेल अशी त्याची रचना करून घेते व फुले, बेल, दूध वाहून शिवलिंगाची पूजा करते. बर्फापासून तयार करण्यात आलेले शिवलिंग एकदा तुम्हीसुद्धा बघाच.

हेही वाचा… Video: नेहमी तुझंच ऐकायचं? असला बुक्का देईल ना…; लहान भावाचे बहिणीशी खेळण्यावरून भांडण; म्हणाला…

व्हिडीओ नक्की बघा :

बर्फापासून तयार केले शिवलिंग :
भारतात मोठ्या प्रमाणात शिव पूजा ही शिवलिंग यांच्या स्वरूपात होताना दिसते. आतापर्यंत तुम्ही विविध प्रकारचे शिवलिंग पाहिले असतील, पण बर्फापासून तयार करण्यात आलेले शिवलिंग तुम्ही आजवर पहिले नसेल. तरुणी सगळ्यात आधी टेबलावर एक स्टीलचे ताट उलटे ठेवते. त्यावर छोटा गोल आकाराचा एक बर्फाचा तुकडा ठेवते आणि त्यानंतर त्यावर ट्रेच्या आकाराची एक बर्फाची लादी ठेवून देते आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी टोपातला बर्फ ठेवून देते. बर्फाचे विविध आकार ती अगदी शिवलिंगाच्या रचनेत ठेवते आणि अशा प्रकारे व्हिडीओत बर्फाचे शिवलिंग तयार होते.

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ @priyankalove6027 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. बर्फाचे शिवलिंग तयार करणाऱ्या तरुणीचे नाव प्रियांका असे आहे. “बर्फाचे शिवलिंग” असे कॅप्शन लिहिण्यात आलेला हा व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. खूप छान, हर हर महादेव अशा कमेंट करत शिवभक्त तरुणीच्या कल्पनेचं कौतुक करताना दिसून आले आहेत; तर काही जण तरुणीच्या अनोख्या रचनेची प्रशंसा करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत