कोणत्याही कार्यक्रमाला जाताना आपण सुंदर दिसावे यासाठी स्त्रिया विविध प्रकारचे दागिने घालतात. केसांची आकर्षक अशी केशरचना वा हेअरस्टाईल करतात. सुंदर असा मेकअप करतात. तसेच आपल्या रोजच्या आयुष्यातसुद्धा आपण उठून दिसावे यासाठी गळ्यात एखादी बारीकशी चेन-नेकलेस आणि कानात वेगवेगळ्या स्टाईल आणि ट्रेंडी फॅशनचे कानातले मुली घालत असतात. मात्र, फॅशन म्हणून एका तरुणीने कानात डूल म्हणून चक्क स्वतःचे केस घातले आहेत आणि आता त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

हे वाचून तुम्हाला धक्का बसणे स्वाभाविक आहे; परंतु हे खरे आहे. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर makeup_n_tips_by_somrita नावाच्या अकाउंटवर ही विचित्र फॅशन करून दाखवल्याचे पाहायला मिळते. नेमके तिने काय केले आहे ते पाहू. तर व्हायरल व्हिडीओच्या सुरुवातीला व्हिडीओमधील तरुणीने एका कात्रीच्या मदतीने आपल्या केसांची एक मोठी बट कापून घेतली आणि या कापलेल्या एका बटीला दोन भागांत सामान विभागून घेतले.

Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
US man reads with giant anaconda Snake shocking video Viral
बापरे! बिछान्यावर भल्यामोठ्या ॲनाकोंडा सापाला घेऊन झोपला अन्…; पाहा भयावह VIDEO
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
woman made saree from newspaper video viral
“अरे ही तर उर्फी जावेदपेक्षा खतरनाक”, तरुणीने चक्क न्यूज पेपरपासून बनवली साडी, Video पाहून लोक झाले शॉक
an old lady amazing dance in grand daughters wedding
आज्जी असायला नशीब लागतं! नातीच्या लग्नात आज्जीने केला भन्नाट डान्स, VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा : फॅशन म्हणून चक्क पायात घातला उंदराचा पिंजरा! पाहा हा Video पाहून तुम्ही चक्रावून जाल

आता या केसांना रिबिन बांधल्यावर जसा आकार येतो तसा ‘बो’सारखा आकार देते. हा आकार तसाच राहावा म्हणून गमच्या मदतीने ते केस चिकटवून घेते. आता त्या केसांनी बनविलेल्या ‘बो’वर मध्यभागी एक पांढरा मोती चिकटवते. तसेच, हे कानातले कानात घालण्यासाठी मोतीच्या मागच्या भागास एक बारीकशी काडीदेखील लावून घेते. अशा पद्धतीने तिने केसांपासून कानातले बनवले आहेत. इतकेच नाही, तर ही विचित्र कानातले घालूनसुद्धा दाखवले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालरल्या या विचित्र फॅशनबद्दल नेटकरी नेमके काय म्हणत आहेत ते पाहू.

“हे असे कानातले घेण्यापेक्षा मी दुसरे कानातले विकत घेईन. कृपया असे काही करू नका,” असे एकाने लिहिले आहे. “तुम्हाला या कानातल्यांची मोठी ऑर्डर मिळाली तर…,” असे दुसऱ्याने लिहिले आहे. “आजवरची सर्वांत फालतू कल्पना आहे ही,” असे स्पष्टपणे तिसऱ्याने लिहिले आहे. “अजिबात चांगले दिसत नाहीये,” चौथ्याने सांगितले. “वाह! खूपच सुंदर… पुन्हा अजिबात बनवू नका,” असे पाचवा म्हणत आहे.

हेही वाचा : Viral Video : बिस्किटाच्या पाकिटांपासून बनवली भन्नाट पर्स! कचऱ्यातून कला म्हणजे काय, याचे उत्तम उदाहरण पाहा

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून @makeup_n_tips_by_somrita नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर झालेला आहे. या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत ५.८ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत.

Story img Loader