Shocking video: Shocking video: रील बनवण्यासाठी हल्ली लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. या रील्सच्या नादात आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. पण, त्यातूनही लोक धडा घेताना दिसत नाही. लोक रीलसाठी कधी स्वत:चा तर कधी इतरांचा जीवदेखील धोक्यात टाकायला अजिबात घाबरत नाहीत. यात हल्ली रेल्वेस्थानक, ट्रेनच्या पटरीवरही अगदी बिधास्तपणे रील व्हिडीओ शूट करत असतात. असाच प्रकार समोर आला आहे, जिथे एक तरणी रील शूट करण्यासाठी थेट रेल्वे रुळावर चालत आहे. बर समोरुन भरधाव वेगात एक्सप्रेस येत आहे तरी ती रुळावरुन बाजूला झाली नाही मग शेवटी काय झालं तुम्हीच पाहा..

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिला रेल्वे ट्रॅकवर उभी होती आणि ट्रेन तिच्या दिशेने वेगाने जात असताना ती व्हिडिओ बनवत होती. यावेळी ट्रेनचालक वारंवार हॉर्न वाजवत होता मात्र ती रील बनवण्यात इतकी मग्न होती की, ट्रेन आल्याचंही भान तिला राहिलं नाही. व्हिडीओचा शेवट पाहून तुम्हालाही या तरुणीचा संताप येईल.

Train fight video two females dispute in train shocking video went viral
कहरच! चालत्या ट्रेनमध्ये दोन महिलांनी अक्षरश: मर्यादा ओलांडली, साड्या फाटल्या तरी थांबल्या नाही; धक्कादायक VIDEO व्हायरल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mumbai Local Train Shocking Video viral
मुंबई लोकलच्या लेडीज डब्यात नशेबाज तरुणाचा धिंगाणा, महिलांसमोर थुंकला अन् हातवारे करुन…; पाहा धक्कादायक VIDEO
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Local Train Shocking Video viral
लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ धक्कादायक VIDEO एकदा पाहाच; तुमच्याबरोबरही घडू शकेल अशी घटना
Man Risks Life to Catch Running Train
VIDEO : जीव एवढा स्वस्त असतो का? धावती रेल्वे पकडण्यासाठी थेट रुळावर मारली उडी अन्.. नेटकरी म्हणाले, “जबाबदारी नाही तर मुर्खपणा आहे..”
Mother love Viral Video
‘शेवटी त्यालाही कळली आईची माया…’ मुलाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या आईची ट्रेन गार्डने केली मदत; हृदयस्पर्शी VIDEO पाहून व्हाल भावूक
Attempted of assassination plot iron strip railway track Atgaon Tanshet railway stations
आटगाव-तानशेत रेल्वे स्थानकांदरम्यान रूळावर लोखंडी पट्टी ठेऊन घातपाताचा प्रयत्न

पुढे तुम्ही पाहू शकता, ट्रेन चालकाने लगेच ब्रेक लावला आणि ट्रेन थांबवण्यात यश आले. यावेळी ट्रेनमधील प्रवासीही ही खाली उतरल्याचं दिसत आहे. या घटनेनंतर रेल्वे अधिकारी आणि स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली. ही महिला सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी हे धोकादायक पाऊल उचलत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेवर रेल्वे अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून हा गंभीर निष्काळजीपणा असल्याचे म्हटले आहे. सर्वसामान्य जनतेने रेल्वे रुळांवर असे धोकादायक स्टंट करणे टाळावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. यामुळे तुमचा जीव तर धोक्यात येतोच पण इतर प्रवाशांची सुरक्षाही धोक्यात येते. रेल्वे पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत असून महिलेवर योग्य ती कारवाई करत आहेत. सोशल मीडियावर रील्स बनवण्याची क्रेझ झपाट्याने वाढत आहे, परंतु अशी धोकादायक पावले कधी कधी जीवघेणे ठरतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “हिम्मतीपुढं सगळं शक्य” मगरीनं कुत्र्याला जबड्यात पकडला मात्र ५ सेकंदात डाव पलटला; लढाईचा शेवट पाहून तुम्हीही व्हाल हैराण

काही लोक लाइक्स आणि व्ह्यूजच्या शर्यतीत आपला जीव धोक्यात घालण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरीही संताप व्यक्त करत आहेत.

Story img Loader