Shocking video viral : सोशल मीडियावर तुम्हाला दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरल झालेले व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यामध्ये वेगवेगळ्या घटनांचे आणि वेगवेगळे व्हिडिओ असतात. असे अनेक व्हिडीओ आहेत की, जे पाहिल्यानंतर तुम्ही खूप भावूक होतात; तर काही व्हिडीओ असेही असतात की, जे पाहिल्यानंतर संताप येतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणीने ऑटोचालकाला अशा प्रकारे मारहाण केली की, तो अक्षरश: रक्तबंबाळ झाला आहे. त्याच्या डोक्यातून रक्तस्राव होत आहे. या तरुणीने ऑटोचालकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुलीने ऑटो चालकाला मारहाण केली

सध्या रस्त्यावर वाहनचालकांना सावधगिरीने वाहन चालवावे लागते. पण, कित्येकांना क्षुल्लक बाबीवरून विनाकारण मारहाणीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. अशा घटनांमध्ये लोक कधी कधी इतके हिंसक होतात की, ते एकमेकांना मारायलाही मागे-पुढे पाहत नाहीत. काही वर्षांपूर्वी दिल्लीत एका मुलाने आपल्या कारद्वारे दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक केले होते. दरम्यान, संतप्त तरुणांनी त्यांना बेदम मारहाण केली होती. आज पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार घडला आहे. दिल्लीतील निहाल विहारमध्ये एका ऑटोचालकाला एका तरुणीने बेदम मारहाण केली आहे.

नक्की घडलं काय?

तरुणी बुलेट चालवीत असताना तिच्या पुढे एक जण रिक्षा चालवीत होता. तरुणीने हॉर्न वाजवून, त्याला पुढे जाण्याचा इशारा दिला. मात्र, त्या रिक्षाच्याही पुढे वाहने असल्याने रिक्षाचालकाला रिक्षा पुढे नेता आली नाही. परंतु, परिस्थिती समजून घेण्याऐवजी त्या तरुणीने चालकाला रिक्षातून बाहेर काढले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. तरुणीने रिक्षाचालकाच्या डोक्यावर धारदार वस्तूने वार केले. त्यामुळे त्याच्या डोक्याला जखम होऊन रक्तस्राव सुरू झाला. यावेळी आजूबाजूच्या लोकांनीही तिला रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र ती हिंसक पद्धतीने रिक्षाचालकाला मारत राहिली. तो रक्तबंबाळ झाल्यानंतर तिने तिथून पळ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मरीन ड्राइव्हवर १० लाख लोक जेव्हा फक्त ‘त्या’ एकाचं नाव घेतात; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

व्हायरल झालेला हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @gharkekalesh नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ९.२ लाखांहून अधिक वेळा पाहण्यात आले आहे. त्यावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यापैकी एका युजरने लिहिले, “हा खुनाचा प्रयत्न आहे.” तर दुसरा म्हणतो, “पोलिसांनी आपले काम प्रामाणिकपणे केले, तर तरुणीला शिक्षा होईल.”