world cup 2023 final: १९ नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अंतिम सामन्याचे तिकीट बुकिंग फुल्ल झाले आहे. काहींची इच्छा पूर्ण झाली तर अनेक चाहत्यांना अजूनही स्टेडियममध्ये बसून विश्वचषकाचा अंतिम सामना पाहायचा आहे. याचा फायदा घोटाळेबाजांना मिळत आहे. विश्वचषक अंतिम सामनाच्या तिकिटांचा काळा बाजार करणार्‍या एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. तरीही या घोटाळेबाजांना अद्दल घडत नाही. कारण सोशल मीडियावर व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एका मुलीला स्कॅमरनं चांगलाच गंडा घातला आहे. एका स्कॅमरने एका तरुणीला विश्वचषकाचं तिकीट देतो सांगून ५६ हजार रुपयांना लुटलं आहे. याचे स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हॉट्सअॅप चॅटच्या स्क्रीनशॉटमध्ये असे दिसून येते की, घोटाळेबाज आधी तिला पैसे देण्यास सांगतो. एक्सवर @emotionalwr3ckk या अकाऊंटवर १७ नोव्हेंबर रोजी व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. त्यात या तरुणीनं लिहिले आहे की, ‘माझी फसवणूक झाली आणि आता मला खूप वाईट वाटत आहे. पुढे ती सांगते, एक्सवर मी वर्ल्डकप सामन्यांच्या तिकीट विक्रीची पोस्ट पाहिली आणि विचारपूस केली यावेळी जेव्हा मी तिच्याशी बोलले तेव्हा मला वाटले की ती अगदी खरी आहे. म्हणून मी तिचा नंबर घेतला आणि बोलणं पुढे नेले. मात्र, तिकिटासाठी मोठी रक्कम भरल्यानंतर माझी फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
IND vs AUS Paine criticism of Gautam Gambhir ahead Border Gavaskar Trophy
IND vs AUS : ‘… तो भारतीय क्रिकेट संघासाठी योग्य नाही’, रिकी पॉन्टिंगनंतर टिम पेनने गौतम गंभीरवर साधला निशाणा
India wins the match as well as the series against South Africa
भारताचा दणदणीत विजय; तिलक वर्मा व संजू सॅमसनची धमाकेदार कामगिरी
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
Ranji Trophy Goa Batters Highest Ever Partnership in 90 Year Old History
Ranji Trophy: ६०६ धावांची विक्रमी भागीदारी अन् गोव्याच्या २ फलंदाजांची त्रिशतकं, रणजी ट्रॉफीच्या ९० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी अन्य देशात हलवल्यास पाकिस्तान बोर्डाला कोट्यवधींचा फटका; कसा ते जाणून घ्या

तुम्ही या मुलीनं केलेली चूक करू नका. अशाप्रकारे कुठल्याही अज्ञात वेबसाईटवरून तिकिट खरेदी करू नका.

पाहा फोटो

हेही वाचा >> VIDEO: हृदयद्रावक! बाळासकट आई नाल्यात पडली; माणुसकीने वेळीच एंट्री केल्याने “क्रूर वेळ” टळली

पैसे पाठवण्याच्या आधी ती मला रिप्लाय करत होती मात्र जसे मी पैसे पाठवले तसा तिच्याकडून रिप्लाय यायचा बंद झाला. यानंतर माझ्या लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आहे. दरम्यान या मुलीनं शेअर केलेला फोटो आणि तिची फसवणूक झाल्यांच खोटं आहे असे नेटकरी म्हणत आहेत. कारण तिनं सेव्ह केलेला नंबर आणि तिने पैसे ट्रॅन्सॅक्शन केलेल्या पैशाचा स्क्रिनशॉट यामध्ये नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल आहे. त्यामुळे ही तरुणी खोटं बोलत असल्याचं नेटकरी आरोप करत आहेत. दरम्यान हे असं असलं तरी सध्या वर्ल्ड कपची इतकी क्रेझ आहे की अशी फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.