केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त भार संभाळणाऱ्या पियूष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हंगामी अर्थसंकल्प सादर केला. शेतकरी, मध्यमवर्ग आणि कामगार वर्गाला प्रामुख्याने डोळयासमोर ठेवून या अर्थसंकल्पात महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरु होती. पण यावेळी अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. या व्हिडीओत केंद्रीय मंत्री नागरिक उड्डयाण राज्यमंत्री जयंत सिन्हा होते. पण ही चर्चा वेगळ्याच कारणासाठी होती.

झालं असं की अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर संसदेबाहेर जयंत सिन्हा प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत होते. त्यांनी मोदी सरकारचं अभिनंदन करत विरोधकांवर टीका केली. यावेळी त्यांच्या मागे एक मुलगी वावरत होती. सुरुवातीला शांत उभ्या असणाऱ्या या मुलीने अचानक कॅमेऱ्याकडे पाहून वाकुल्या काढून दाखवण्यास सुरुवात केली. महत्त्वाचं म्हणजे जयंत सिन्हा किंवा आजुबाजूला असणाऱ्या कोणालाही याची कल्पनाही आली नाही. या मुलीने फक्त एकदा नाही तर तीन ते चार वेळा कृतीची पुनरावृत्ती केली.

हा सर्व प्रकार कॅमेऱ्या कैद झाला आणि सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला. दरम्यान अशाप्रकारे संसदेत एका नेत्याच्या मागे उभे राहून इतक्या बिनधास्तपणे वाकुल्या काढून दाखवणारी मुलगी कोण आहे असा सवाल विचारला जात आहे.

Story img Loader