आपण आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेकडो फोटो काढतो, सोशल मीडियावर अपलोड करतो. एखादा कौटुंबिक कार्यक्रम आला की कुटुंबियांसोबतही असेच वेगवेगळे हावभाव करत फोटो काढण्याचा योग येतो. पण कुटुंबियांसोबत आवडीचे फोटो टाकणे एका भारतीय वंशाच्या तरूणीला चांगलेच महागात पडले. आपल्या आईचा फोटो क्रॉप करून तिने बाजूला काढला आणि भावांसोबतचा एडिट केलेला फोटो तिने सोशल मीडियावर टाकला. याने तिची आई अशी काही भडकली की आता या सा-या प्रसंगावर सगळीकडे हसे होत आहे.

वाचा : हत्येच्या आरोपाखाली तुरूंगवास भोगलेला ‘तो’ गुन्हेगार सीईओ होणार

अमेरिकेतल्या मेरीलँड येथे राहणा-या एका तरुणीने ट्विटर एक फोटो अपलोड केला होता. लग्नसमारंभातला हा फोटो असून तरूणीने आपल्या आई आणि दोन भावांसोबत फोटो काढला होता. पण तिने आपल्या आईला या फोटोतून क्रॉप करून फक्त भावासोबतचा आपला फोटो ठेवला. त्यामुळे आईला असा काही राग आला की आईने या मुलीला बडबडायलाच सुरुवात केली. ‘मला फोटोतून का क्रॉप केले? मुर्ख मुलं. तुम्हाला जन्माला घालण्यासाठी किती कष्ट सोसले आहेत आणि मलाच फोटोतून क्रॉप केले’ असा लांबलचक मेसेज या आईने आपल्या मुलीला पाठवला. तेव्हा दुखी: झालेल्या आईची समजूत काढण्यासाठी या मुलीने ट्विट केले की आईसोबत मी कितीतरी फोटो काढले आहे. पण भावांसोबत माझा एकही फोटो नाही. म्हणून मी त्यांच्यासोबत फोटो ठेवला. हा सारा प्रकार आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असे फक्त भारतीय आईच करु शकते असे एकापेक्षा एक विनोद सोशल मीडियावर सुरु आहेत.

mom-crop-mgs-670-size