Viral video: सोशल मीडियावर दररोज हजारो लाखो व्हिडीओ शेअर होत असतात. व्हिडिओ स्क्रोल करताना कधी-कधी असे व्हिडिओ डोळ्यांसमोर येतात, जे पाहून यूजर्सला हसू आवरता येत नाही. म्हणजेच सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचं उत्तम माध्यम बनलं आहे. आज तुमचा मूड ऑफ असेल तर आम्ही तुमच्यासाठी असाच एक व्हिडीओ घेऊन आलो आहोत, जो पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरून हसाल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

दुचाकी किंवा स्कूटी घेऊन रस्त्यावर निघताना नेहमी हे लक्षात ठेवा की हेल्मेट घालणं गरजेचं आहे. हेल्मेट हे पोलिसांनी दाखवण्यासाठी नाही तर आपल्या स्वत: च्या रक्षणासाठी आहे. त्यामुळे ते घेतलंच पाहिजे. पण असं असलं तरी देखील काही तरुण मंडळी या गोष्टींना गांभिऱ्याने घेत नाही आणि मग त्यांचं नुकसान होणं सहाजिकच आहे. सोशल मीडियावर तुम्ही या संबंधीत अनेक व्हिडीओ पाहिले असतील. अनेकांना यामुळे चांगलीच अद्दल घडली आहे. अशाच एका विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. फक्त विना हेल्मेट गाडीच नाहीतर ती मागून येणाऱ्या बाईकच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात चांगलीच तोंडावर आपटली आहे.

What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Aunty dance Hawa Hawa Aye Hawa
“हवा हवा ऐ हवा, खुशबू लुटा दे…” गाण्यावर काकूंनी केला दिलखुलास डान्स, Viral Video पाहून तुम्ही व्हाल खुश, एकदा बघाच
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
selena gomez crying video america imigration policy
Video : “माझ्या लोकांवर हल्ले…”; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे रडली सेलेना गोमेझ, नेमकं काय घडलं?
netizen troll to marathi singer juilee joglekar for her kandepohe performance
Video: “वेगळं काय तरी करा…”; जुईली जोगळेकरच्या ‘त्या’ परफॉर्मन्सवर नेटकऱ्याची खोचक प्रतिक्रिया, गायिका म्हणाली…
Zeenat Aman shares her pill swallowing horror story
“औषध घेताना गोळी घशात अडकली अन् माझा श्वास…..”; झीनत अमानने सांगितला भयावह किस्सा; तुमच्याबरोबर असे घडले, तर काय करावे?

मुली काहीतरी हटके करायला गेल्या आणि तो जर त्यांचा प्रयत्न फसला तर नेटकरी मुलींची चांगलीच थट्टा करतात. पापा की परी म्हणून चिडवतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील मुलींनाही नोटकऱ्यांनी पापा की परी असं नाव दिलंय. त्याला कारणही तसंच आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मुलगी भरधाव वेगाने स्कूटर चालवताना दिसत आहे. शहरातील एका अरुंद रस्त्यावर तरुणी दुचाकीला ओव्हरटेक करते. यानंतर मुलगी बाईक चालवणाऱ्या मुलांकडे मागे वळून पाहते त्यानंतर ती वेग वाढवण्यासाठी एक्सलेटर वळवताच स्कूटरचे नियंत्रण सुटते आणि याचवेळी तिचा तोल जातो. पुढे ती जोरात रस्त्यावर पडते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: गावातल्या मुलींना शहरातली मुलं जास्त का आवडतात? तरुणींची उत्तर ऐकून कळेल गावच्या पोरांची लग्न का ठरत नाही

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ८६ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, ‘ही रस्त्याची चूक आहे.’ कमेंट करताना आणखी एका यूजरने लिहिले आहे, ‘दीदी आरामात, हेल्मेट घाला आणि डोकं वाचवा’, अशी प्रतिक्रिया आणखी एका यूजरने दिली आहे. दुसऱ्या युजरने कमेंट केली आहे, ‘पप्पाची लाडकी परी.

Story img Loader