Valentine Week Viral Love Story : व्हॅलेंटाईन वीक सुरु असून प्रेमीयुगुल मनातील प्रेमळ भावना व्यक्त करण्यासाठी सज्ज झाले आहेत. कुणीतरी आपला जीवनसाथी व्हावा अन् आयुष्याची प्रवासात प्रेमळ भावनांचा वर्षाव व्हावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण मनात दाटून आलेल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी अनेक तरुण १४ फेब्रुवारीची वाट पाहतात. आता या लव्हबर्ड्सची प्रतिक्षा जवळपास संपली आहे. कारण उद्याच व्हॅलेंटाईन डे असल्याने प्रेमीयुगुलांची प्रेम व्यक्त करण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण एका तरुणाने व्हॅलेंटाईन डे आधीच एका मुलीला वर्गातच लाल गुलाब घेऊन प्रपोज केला. पण त्या मुलीने तरुणाला आयुष्यभरासाठी चांगलीच अद्दल घडवली. प्रेम व्यक्त करणारा दिवस नसनाही तो तरुण वर्गात हिरोगीरी करायला गेला अन् स्वत:ची फजिती करुन बसला. हा संपूर्ण प्रकार वर्गातील विद्यार्थ्यांनी कॅमेरात कैद केला असून व्हिडी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा