तुम्ही काही बिस्किटे खाल्ले असतील ज्यात लहान चॉकलेट चिप्स असतील. बिस्किटाच्या पृष्ठभागावर चिप्स पसरतात आणि जेव्हा बिस्किट खाल्ले जाते तेव्हा त्याची चव उत्कृष्ट असते. बिस्किट खरेदी करताना तुम्ही त्यावर जिरे, शेंगदाणे किंवा तीळ पाहिलं असेल, पण कधी कधी अशा गोष्टींचा दर्जाही तपासावा. तीळ किंवा चॉकलेट चिप्स समजून मुंग्यांनी गुंडाळलेले बिस्किट खाल्ले तेव्हा एका महिलेची फसवणूक झाली.

असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका टिकटॉक वापरकर्त्याने त्याच्या सोबत घडलेल्या घटनेचा सविस्तरपणे वर्णन केले आहे. TikToker Brenna ने वापरकर्त्यांना पुढील वेळी टॉपिंगसह बिस्किटे खाण्यापूर्वी तपासण्याचा सल्ला दिला आहे.

महिलेने स्वतःबद्दल सांगितले की, जेव्हा तिने पॅकेट उघडले आणि बिस्किट खाल्ले तेव्हा तिला वाटले की बिस्किटावर तीळ, जिरे किंवा चॉकलेट चिप्स आहेत. पण बिस्किट्स खाताना जेव्हा तोंडाला खूप वाईट चव लागली म्हणून महिलेने बिस्किटाचा पृष्ठभाग तपासला तेव्हा संपूर्ण बिस्किट्स पॅकेट मुंग्यांनी भरलेले होते. त्यानंतर मुंग्यांनी भरलेले बिस्किट खाल्याचे महिलेला समजताच महिलेने आरडाओरड सुरू केला.

ब्रेना (@brennaj77) ने तिच्या फॉलोअर्सला चुकून मुंग्यांनी भरलेले बिस्किट खाल्ल्याचा अनुभव सांगण्यासाठी TikTok वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. TiKToker ने तिचा अनुभव कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला आणि नंतर खाल्लेली बिस्किटे दाखवण्यासाठी कॅमेरा फ्लिप केला. ऑन-स्क्रीन ब्रेना म्हणाली, ‘मला वाटले ते चॉकलेट चिप्स आहेत… मी आधीच दोन बिस्किटे खाल्ली आहेत.’ ही छोटी क्लिप आतापर्यंत २० दशलक्षाहून अधिक वेळा पाहिली गेली आहे.

Story img Loader