कोण म्हणतं स्वप्न पूर्ण होत नाही. ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’ या वाक्याला साजेल असे उदाहरण पाहावयास समोर आले आहे. पोलीस किंव्हा सैन्य दलात भरती होण्यासाठी लाखो मुलं तयारी करतात.अत्यंत कठीण परिश्रम करूनही त्यात मोजकेच यशस्वी होतात. अशाच एका महाराष्ट्र पोलिसात निवड झालेल्या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक पिढ्या दारिद्र्यात गेलेल्या, घरात कुणीही शिकलेलं नाही. मात्र मुलीने ना अकॅडमी ना क्लास, मनात फक्त ध्यास या तत्वावर प्रचंड मेहनत घेतली आणि अशिक्षित आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात आपसूकच पाणी येईल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आई-वडिल आपल्या मुलीची वाट पाहत आहेत. तेवढ्यात मुलगी येते आणि आईला अश्रू अनावर होतात. तिची आई अतिशय भावनिक होते आणि रडू लागते. लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न पूर्ण होताना पाहून आईचा आनंद गगनात मावेनासा झालाय. त्याचवेळी शेजारी वडीलही आनंदात बसलेले दिसत आहेत. मुलगी नको पासूनचा सुरु झालेला प्रवास आज मुलीनेच आई-वडिलांची मान अभिमानानं वर केली आहे. आपली मुलगी पोलीस झाली याचा आनंद स्पष्टपणे सगळ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.
दरम्यान आईला पाहून, आईचं स्वप्न पूर्ण करुन मुलीलाही अश्रू अनावर झाले आहेत. मुलगीही आईच्या बाजुला बसून रडताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
पाहा व्हिडीओ
ठरवलं तर सगळं काही शक्य आहे. जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असली की परिस्थिती कशीही असो त्यातून मार्ग काढत यश आपलंच असतं हे या मुलीनं दाखवून दिलं आहे.